Akshaya Tritiya 2024: Do these five special measures on Akshaya Tritiya, Vastu will never be harmed!
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 12:27 PM1 / 5अक्षय्य तृतीया हा शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा. यासाठी दिवाळीत आपण दिवा, पणती लावून रोषणाई करतो, त्याप्रमाणे अक्षय्य तृतीयेला दारात मातीचा दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करावे आणि तिचा आशीर्वाद लाभावा म्हणून प्रार्थना करावी.2 / 5हिंदू संस्कृतीत प्रत्येक पूजेत ऋतुकालीन फळा फुलांचा पूजेत समावेश केला जातो. सध्याचा ऋतूचा आणि सर्व फळांचा राजा आंबा एव्हाना बाजारातच काय तर घराघरातही दाखल झाला असेल. तो उपलब्ध नसेल तर अन्य कोणतेही फळ देवपूजेत ठेवून सुख समृद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी.3 / 5कापूस हे सुबत्तेचे लक्षण आहे. म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी थोड्याशा कापसाची वस्त्रे करून किंवा देवाला कापसाचे आसन करून त्याची पूजा करावी. त्यामुळे घरात सुबत्ता कायम राहील.4 / 5मीठ केवळ आहारशास्त्रात नाही, तर वास्तुशास्त्रातही अतिशय महत्त्वाचे आहे. आयुर्वेद तसेच ज्योतिषशास्त्र देखील मिठाचे महत्त्व अधोरेखित करते. मिठाशिवाय अन्न अळणी लागते. ते योग्य प्रमाणात आहारात असलेच पाहिजे. शिवाय धन संपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी. मीठ सागरातून मिळते आणि आणि लक्ष्मी ही सागर कन्या असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती प्रसन्न होते अशी मान्यता आहे.5 / 5तुळशीची पूजा केवळ उत्सवप्रसंगी नाही, तर दैनंदिन जीवनातही केली जाते. तुळशीच्या पूजेने आणि सेवनाने आयुरारोग्य लाभते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवीकडे आरोग्य वृद्धीचे दान पदरात पाडून घेणे, याहून शुभ काय? त्यामुळे तुळशीची साग्रसंगीत पूजा करून निरोगी आयुष्याची मनोकामना करावी. आणखी वाचा Subscribe to Notifications