शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 10:10 AM

1 / 9
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! या दिवशी शेतीच्या कामाची हत्यारे करावयाला प्रारंभ करतात. सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा आहे. या तिथीला केलेले दान अक्षय्य राहाते म्हणून या तिथीस ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. ती अक्षय्यी फलदायिनी असते, असेही सांगतात.
2 / 9
सन २०२४ मध्ये शुक्रवार, १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. शुक्रवार हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी विशेष मानला जातो. त्यामुळे यंदाच्या अक्षय्य तृतीयेला वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला दोन विशेष राजयोग जुळून येणार असल्याचे म्हटले जात आहे. गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून नवग्रहांचा राजकुमार मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीतील सूर्याशी बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे.
3 / 9
तसेच बुध आणि शुक्राचा लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे. हाही एक शुभ राजयोग मानला जातो. अक्षय्य तृतीया ही शुभ योगात साजरी केली जाणार असून, याचा लाभ काही राशींना मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. भाग्यवान ६ राशी कोणत्या? जाणून घेऊया...
4 / 9
मेष: करिअर आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळू शकतील. उधारी किंवा उसने दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. करिअरमध्ये एक मोठा टप्पा गाठू शकतो. इतर कंपन्यांकडून चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात किंवा जिथे काम करता तिथे तुम्हाला बढती मिळू शकते. कुटुंबात आनंद राहील आणि सर्व लोकांमध्ये चांगले सामंजस्य राहील.
5 / 9
वृषभ: अक्षय्य तृतीया फायदेशीर सिद्ध होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. जीवनातील आर्थिक तंगीपासून दिलासा मिळू शकेल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता दिसत आहे. माता लक्ष्मीच्या विशेष कृपेने सुख-समृद्धी राहील. चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल. व्यवसायात चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत. बौद्धिक कौशल्यामुळे एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो.
6 / 9
मिथुन: अक्षय्य तृतीया लाभदायी ठरू शकेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उधार, उसने दिलेले पैसे परत मिळू शकतात. बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते. चांगली बचत करण्यात यश मिळेल. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते. नोकरीत बढती व इतर लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळू शकतो.
7 / 9
सिंह: अक्षय्य तृतीयेचे राजयोग वरदानाप्रमाणे ठरू शकतात. अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. लक्ष्मी-नारायण योगाद्वारे लक्ष्मी देवीच्या विशेष आशीर्वादाने धनाची कमतरता भासणार नाही. वाहन आणि घराचे सुख मिळेल. छोट्या सहलींचा फायदा होऊ शकतो.
8 / 9
तूळ: संपत्ती आणि पदोन्नतीची संधी मिळू शकेल. आर्थिक बाबींमध्ये विशेष लाभ मिळू शकतील. पैसे कमविण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. जीवनात सकारात्मक बदल होतील.
9 / 9
मकर: सुख आणि भौतिक सुविधा वाढू शकतात. जीवनात प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. लक्षणीय नफा मिळविण्याची संधी मिळेल. आनंद वाढेल. आर्थिक बाबतीत भाग्यवान ठरू शकाल. पैसे कमावण्यासोबत चांगली बचत करू शकाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीया