Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला होणार उत्तम ग्रहस्थिती; 'या' चार राशींसाठी सुरू होणार भाग्योदयाचा काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 07:00 IST
1 / 6आषाढी एकादशी हा मुळातच एक शुभ योग आहे. शिवाय ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून पाहता या दिवशी आणखी काही शुभ योग्य तयार होत आहेत, ज्याचा लाभ चार राशींना होणार आहे. ते योग कोणते आणि त्या भाग्यवान राशी कोणत्या ते पाहू. 2 / 6१७ जुलै २०२४ रोजी देवशयनी एकादशी आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत. या योगांची निर्मिती खूप शुभ असते. या शुभ योगांपैकी देवशयनी एकादशीचे व्रत, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना केल्याने भरपूर सुख आणि समृद्धी प्राप्त होते. त्याचा शुभ परिणाम बाराही राशींना मिळेलच, तरीदेखील पुढील चार राशींसाठी हा सर्वोत्तम काळ ठरणार आहे. 3 / 6देवशयनी एकादशीच्या दिवशी तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु त्याच वेळी खर्च देखील वाढेल. सकारात्मक विचार ठेवा, फायदा होईल. चातुर्मासाचा काळ लाभदायी आहे, संधीचा फायदा घ्या आणि भरपूर मेहनत करा. शुभ फळ मिळेल. 4 / 6देवशयनी एकादशी वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या जुन्या समस्या दूर होतील. प्रेम प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर या काळात तुमच्या नात्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. इच्छित पद आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे.5 / 6सिंह राशीच्या लोकांना देवशयनी एकादशीच्या दिवशी लाभ होऊ शकतो. तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. मोठ्या कामाचे नेतृत्त्व करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. या काळात तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील आणि यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.6 / 6कन्या राशीच्या लोकांना देवशयनी एकादशीला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील तर त्यातून तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. कौटुंबिक सौख्याचा पुरेपूर आनंद घ्याल.