शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astro Remedies For Money: या सवयींमुळे हाती टिकत नाही पैसा, कदाचित तुम्ही तर या चुका करत नाहीत ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:44 AM

1 / 7
Astro Remedies For Money: अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येत व्यक्तीसाठी आवश्यक गोष्टी आहेत. परंतु याशिवाय आणखी एक आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे पैसा. परंतु अनेकवेळा आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्याला पैशाची चणचण जाणवू लागते.
2 / 7
ज्योतिष आणि वास्तूमध्ये माणसाच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे व्यक्तीला धन मिळवण्यात किंवा धन संचय करण्यात अडचणी येत असतात. आज आपण जाणून घेऊया कोणत्या चुकांमुळे आपल्या हाती पैसा टिकत नाही.
3 / 7
अनेक लोकांना नेलकटरचा वापर न करता आपल्या दातांनी नखं कापण्याची सवय असते. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचा प्रभाव कमी होण्याचं लक्षण मानलं गेलं आहे. देवी भागवत पुराणानुसार नखांनी जमीन कुरतडण्यानंही देवी लक्ष्मी नाराज होते असं म्हटलं गेलं आहे.
4 / 7
जर तुम्ही दररोज आंघोळ करत नसाल आणि आसपासच्या साफसफाईचीही काळजी घेत नसाल तर अशा स्थितीत शुक्र दोष उत्पन्न होतो. असं म्हटलं जातं. हेदेखील तुमच्या आर्थिक यशात बाधा ठरू शकतं. त्यामुळे तुम्हाला ही सवय बदलायला हवी.
5 / 7
काही लोकांना चालताना पाय घासत चालण्याची सवय असते. परंतु ही सवय देखील बदलणं आवश्यक आहे. चालताना पाय उचलून चालण्याची सवय अंगी कारली पाहिजे. पाय घासत चालणाऱ्या व्यक्तीकडील धन कमी होतं असं म्हटलं जातं. तसंच दांम्पत्य जीवनातही समस्या येतात असं मानलं जातं.
6 / 7
थुंकण्याची सवयदेखील अतिशय वाईट असल्याचं मानलं जातं. जर तुम्ही इकडे तिकडे थुंकत असाल तर तुम्हाला ही सवय त्वरित बंद करायला हवी. असं केल्यास धन आपल्याकडे थांबत नाही असं म्हणतात.
7 / 7
जेवल्यानंतर अनेक जण भांडी, ताटं तशीच ठेवतात किंवा ते दुसऱ्या दिवशी धुतात. शिवाय घरात कपडेही इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले असतात. गरूड पुराणानुसार जर तुम्ही घर अशाप्रकारे ठेवलं तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. यासाठी घरात कपडे, बुट आणि अन्य सामान अस्ताव्यस्त ठेवू नये.
टॅग्स :MONEYपैसाVastu shastraवास्तुशास्त्र