शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astro Tips: ग्रहपीडा, शत्रुपीडा,वास्तुदोष,पितृदोष,स्वभावदोष या सर्वावर रामबाण उपाय 'हे' एक स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:10 PM

1 / 14
४० दिवसांच्या रोज १२ वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात. १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू.श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात सांगतात.
2 / 14
दर बुधवारी ४ वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते. तसेच नियमित रोज १२ वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.
3 / 14
एकादशीच्या रात्री १२ वाजता स्नान करून विष्णुपुढे (राम/बालाजी/पांडुरंग/कृष्ण,फक्त नृसिंह नको) तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२ एकादशीना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते .
4 / 14
सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात.
5 / 14
वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.
6 / 14
बाहेरचा त्रास असेल, संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.
7 / 14
श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो,त्याचे सर्व अहित नाहीसे होते,त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो.
8 / 14
बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते,ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते
9 / 14
घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्रीविष्णु यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या तीन नावानी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो.
10 / 14
विष्णुसहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी विष्णुसहस्रनामाच्या आधी व शेवटी ३ वेळा ॐ नम: शिवाय आणि ३ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.
11 / 14
श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की,जो या स्तोत्राचे नित्य पठन करेल त्याला महादानाचे पुण्य मिळेल!
12 / 14
पिंपळाच्या पारावर बसून विष्णुचे ध्यान करीत जो विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळू हळू नष्ट होतात.
13 / 14
आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर,तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाउल ठेवण्या आधी मनातल्या मनात ४ वेळा नारायण, नारायण नारायण नारायण असे नाम घ्यावे.
14 / 14
शिवालयात, तुलसीवनात बसून जो रोज विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो,त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्र