शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astro Tips: 'अच्छे दिन' येण्याआधी दिसू लागतात 'ही' शुभचिन्हे; वाचा ज्योतिष शास्त्रीय संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 1:39 PM

1 / 6
वास्तुशास्त्रात असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ सुरू होण्यापूर्वी त्याला काही शुभ चिन्हे दिसू लागतात. पण आपल्याला ती लक्षात येत नाहीत.आज आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहोत, जे पाहून तुम्हाला आगामी सुखाचा काळ सहज ओळखता येईल.
2 / 6
वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रामध्ये अशी काही चिन्हे सांगितली आहेत, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना पाहते तेव्हा त्याला समजले पाहिजे की त्याचा वाईट काळ लवकरच संपणार आहे. या चिन्हांचा एक अर्थ असाही मानला जातो की तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहेत. यात अनेक प्रकारच्या सिग्नल्सचा समावेश आहे.
3 / 6
जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पक्ष्याचे घरटे बांधलेले दिसेल तर ते वास्तुशास्त्रातही शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे. अशा परिस्थितीत ते घरटे काढू नयेत.
4 / 6
वास्तुशास्त्रात असे मानले जाते की जर तुम्हाला तुमच्या घरात लाल मुंग्यांची रांग दिसली तर ते शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की लवकरच तुमच्यावर धनाची देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
5 / 6
पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला अचानक खाज सुटली तर त्याचा आर्थिक लाभाशी संबंध असल्याचे म्हटले जाते. तसेच स्त्रीचा डावा डोळा फडकणे शुभ मानले जाते, तर पुरुषाचा उजवा डोळा फडकणे शुभ मानले जाते.
6 / 6
सकाळी उठताच मंत्र किंवा शंखाचा आवाज कानावर पडणेदेखील शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी झटत आहात ते तुमचे काम होऊ शकते. कावळ्याचा आवाज मंगल नसला तरी कधी कधी कावळा न थांबता काव काव करत राहतो, ती देखील शुभ वार्ता येण्याची चिन्हे समजावीत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्र