Astro Tips: Tortoise ring is beneficial, but know which finger to wear!
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 1:51 PM1 / 6१. असे मानले जाते, की कासव लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि समुद्र मंथनात ते प्राप्त झाले. घरात कासवाचे चिन्ह ठेवणे शुभ मानले जाते. तसेच अलंकार रूपात परिधान केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.2 / 6२. कासवाची नक्षी असलेली अंगठी घालताना, ती योग्य पद्धतीने घातली पाहिजे.अंगठीची दिशा योग्य असली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण ही अंगठी घालता तेव्हा कासवाचे डोके आपल्याकडे आणि शेपटीची बाजू बाहेरील बाजूने ठेवा.3 / 6३. कासव हे लक्ष्मीशी संबंधित असल्याने शुक्रवार हा अंगठी घालण्यासाठी शुभ मानला जातो, कारण हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो.4 / 6४. अलंकार म्हणून ही अंगठी वापरत असाल तर धातूचे बंधन नाही, परंतु भाग्यकारक म्हणून या अंगठीचा वापर करत असाल ही अंगठी चांदीतून घडवल्यास जास्त लाभदायक ठरते.5 / 6५. ही अंगठी आपण कोणत्या बोटात घातली आहे हे पाहणेदेखील महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की ही अंगठी अनामिकेत म्हणजे करंगळीच्या बाजूच्या बोटातच परिधान केली पाहिजे. तरच ती लाभदायक ठरते.6 / 6६. कासवाच्या गतीने का होईन रोज थोडी थोडी प्रगती केली पाहिजे असे म्हणतात, त्यानुसार ही अंगठी आपल्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल. आणखी वाचा Subscribe to Notifications