ऑक्टोबरमध्ये ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन: ‘या’ ६ राशींचे नशीब उजळेल; उत्तम धनलाभ, भाग्योदय काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 1:17 PM
1 / 11 ऑक्टोबर महिना हा अनेकार्थाने विशेष ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी यांसह महत्त्वाचे सण या महिन्यात साजरे होत आहेत. याशिवाय ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही हा महिना खास ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात ५ ग्रहांच्या स्थानात बदल होणार आहे. 2 / 11 ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला बुध ग्रह ०२ ऑक्टोबर रोजी कन्या राशीत मार्गी होईल. तसेच २६ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. १३ नोव्हेंबरपर्यंत बुध तूळ राशीत असेल. बुधाचे मार्गी चलन आणि राशीपरिवर्तन महत्त्वाचे मानले गेले आहे. 3 / 11 नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ १६ ऑक्टोबर रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. मंगळाचा मिथुन प्रवेशही महत्त्वाचा मानला गेला आहे. यानंतर नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला सूर्य १७ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. १६ नोव्हेंबरपर्यंत सूर्य तूळ राशीत असेल. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला तूळ संक्रांत असेही म्हटले जाते. 4 / 11 नवग्रहातील आणखी एक ग्रह ऑक्टोबर महिन्यात राशीपरिवर्तन करणार आहे. शुक्र कन्या राशीतून १८ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सुख, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या शुक्राचे राशीपरिवर्तन महत्त्वाचे मानले जाते. 5 / 11 नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी २६ ऑक्टोबर रोजी आपलेच स्वामीत्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणार आहे. यापूर्वी कुंभ राशीतून वक्री चलनाने शनी मकर राशीत विराजमान झाला होता. या एकूणच ग्रहस्थितीचा ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो. भाग्य, नशिबाची चांगली साथ लाभू शकते. काहींना धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात, असे सांगितले जाते. जाणून घेऊया... 6 / 11 मिथुन राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि चलनबदल फायदेशीर ठरू शकते, असे सांगितले जात आहे. व्यवसायात तेजी पाहायला मिळू शकेल. तसेच नोकरीतही चांगले परिणाम मिळू शकतात. 7 / 11 कर्क राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि चलनबदल लाभदायक ठरू शकते. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. कामाच्या ठिकाणीही प्रशंसा मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. 8 / 11 सिंह राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि चलनबदल यशकारक ठरू शकते. सिंह राशीच्या लोकांची रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. तसेच, नवीन नोकरी सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ असू शकते. 9 / 11 तूळ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि चलनबदल चिंतामुक्तीचे ठरू शकते. मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. उत्पन्न वाढल्याने तुम्हाला आर्थिक बळ मिळू शकते. वैयक्तिक जीवन शांततापूर्ण राहू शकेल. 10 / 11 वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि चलनबदल चांगले ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. कौटुंबिक जीवनातील तणावही दूर होऊ शकतो. वाहन इत्यादीचे सुखही मिळू शकते. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे, फायदा होऊ शकतो. 11 / 11 मीन राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि चलनबदल लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांना प्रवासाची संधी मिळू शकते. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या समस्याही कमी होऊ शकतात. लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा