शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाकित खरे ठरले! BJPचा ‘करेक्ट कार्यक्रम’; राहु-केतु कृपेने नितीश-तेजस्वी सरकार, पण किती टिकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 8:07 AM

1 / 12
एकीकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी करत शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का दिला. यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत नवे सरकार स्थापन केले. या नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पाडताना, दुसरीकडे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपचा (BJP) करेक्ट कार्यक्रम केला आणि बिहारच्या राजकारणात मोठी उलथापलथ झाली.
2 / 12
भाजपशी असलेली युती तोडून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूंच्या आरजेडीसोबत जवळीक साधली. नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन आरजेडीसोबतच्या १६४ आमदारांच्या समर्थनाचे पत्रही दिले आहे. यामध्ये भाजपचाच गेम झाल्याचे दिसत आहे. या घडामोडी घडत असताना भाजप त्यापासून अनभिज्ञ कसा काय राहिला. बिहारमधील घडामोडींकडे भाजपने दुर्लक्ष केले की कुठलाच पर्याय नसल्याने जे घडतेय ते पाहत राहण्याची हतबलता भाजपवर आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Bihar Political Crisis)
3 / 12
एनडीएसोबत काडीमोड घेत नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही धक्का दिल्याचे सांगितले जाते. भाजपसोबतची युती तोडून लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादवांसोबत (Tejashwi Yadav) पुन्हा सरकार स्थापन करणाऱ्या नितीश यांचे भवितव्य काय असेल. नितीश आणि तेजस्वी नव्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण करू शकतील का? राजकीय उलथापालथ सुरू असताना नितीश आणि तेजस्वी सरकारचे भविष्य काय असेल ते जाणून घेऊया...
4 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, राहु-केतु हे कुशल राजकारण, राजकीय षड्यंत्र आणि आश्चर्यकारक शक्ती बदलांसाठी ओळखले जातात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नोव्हेंबर २०११ पासून राहुची महादशा सुरू आहे. याच स्थितीत २०१३ च्या मध्यात भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविल्याने नाराज होऊन नितीश कुमारांनी विरोधी पक्ष आरजेडी आणि काँग्रेसशी युती केली.
5 / 12
लोकसभा निवडणुकीत जेडीयुच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीश कुमार यांनी मे २०१४ मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री करून नितीश यांनी बिहारमध्ये पक्षासाठी तळागाळात काम सुरू केले होते.
6 / 12
मात्र, मांझी यांच्या बंडखोर वृत्तीमुळे नितीश यांना फेब्रुवारी २०१५ मध्ये पक्षातून काढून पुन्हा बिहारच्या सत्तेची सूत्रे हाती घ्यावी लागली. नितीश कुमार यांनी २०१५ मध्ये महाआघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती. परंतु राहुच्या शनी दशामध्ये त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला.
7 / 12
नोव्हेंबर २०१९ मध्ये नितीश कुमार पुन्हा निवडणूक जिंकली आणि विक्रमी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी त्यांच्या शपथविधीवेळी नितीश कुमार पुन्हा एकदा भाजप सोडतील आणि तेजस्वी यादव यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील, असे भाकित काही राजकीय तज्ज्ञांनी केले होते. आताच्या घडीला ते खरे होताना दिसत आहे.
8 / 12
नितीश कुमार यांचा जन्म ०१ मार्च १९५१ रोजी झाला. सध्या मिथुन राशीच्या आपल्या कुंडलीत राहुची महादशा सुरू असून, गुरुच्या युतीत ‘चांडाळ’ योग तयार होत आहे. त्यामुळेच यावेळी नितीश कुमारांना हतबल होऊन भाजपशी संबंध तोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे.
9 / 12
नितीश कुमारांच्या कुंडलीमध्ये, केतुची अंतर्दशा सध्या मे २०२२ ते मे २०२३ या काळात राहुच्या दशेत असेल. रहस्यमय ग्रह केतु त्यांच्या कुंडलीतील मित्र ग्रह असलेल्या तिसऱ्या घरात स्थित आहे. ज्यावर गुरु, सूर्य आणि बुध यांची दृष्टी राहते, ज्यामुळे त्यांना बलवान मित्रांची साथ मिळेल.
10 / 12
नितीश कुमारच्या मिथुन राशीत, पंचमेश शुक्राची शुभ अंतर्दशा ३२ मे २०२३ पासून सुरू होईल आणि ३१ मे २०२६ पर्यंत राहील. शुक्र त्यांच्या कुंडलीतील दहाव्या घरात मीन राशीत मंगळासोबत आहे, ज्यावर भाग्याचा स्वामी शनीची दृष्टी आहे. राहुमधील शुक्राच्या या शुभ दशात नितीश कुमार सन २०२४ मध्ये दिल्लीतील केंद्रीय राजकारणात पंतप्रधानपदावर दावा करण्यासाठी खूप महत्त्वाकांक्षी बनण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतील. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे.
11 / 12
दरम्यान, भाजप-जेडीयू सरकारला दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत, तोपर्यंत हे सरकार पडले. बिहारमधील एक ज्येष्ठ राजकीय तज्ज्ञांननुसार ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. पंतप्रधानपद मिळवण्याची नितीश कुमार यांची महत्त्वाकांक्षा आहे. तसेच विरोधी पक्षही त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पाहत आहेत.
12 / 12
ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून देशभर फिरून प्रचार केला होता. तसेच नितीश कुमारही देशभर फिरून प्रचार करतील. सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. ममता बँनर्जीसुद्धा ईडीच्या तपासामुळे अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार हे विरोधी पक्षांचे तगडे उमेदवार बनू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे बोलले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा