शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astrology Tips: लक्ष्मी मातेला प्रिय असलेली कमलगट्टा माळ वापरल्याने होणारे लाभ जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:01 PM

1 / 7
कमळाच्या फुलाच्या बीजाला कमलगट्टा म्हणतात. कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते. त्यामुळे कमळाच्या बिजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो असेही म्हणतात. म्हणून यश, कीर्ती, समृद्धी प्राप्तीसाठी कमलगट्टा माळ वापरतात, तिच्या वापराने जप करतात. महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो तशी कमलगट्टा माळ विशेषतः लक्ष्मीचे उपासक वापरतात.
2 / 7
ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की कमलगट्टाची माळ धारण केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्यास माता लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख-समृद्धी राहते. ज्योतिष शास्त्रात कमलगट्टाचे महत्व सांगितले आहे आणि तंत्र शास्त्रात धनवान होण्यासाठी कमलगट्टाच्या काही युक्त्या किंवा उपाय सांगितले आहेत. हे उपाय खूप सोपे आहेत आणि अनेक भाविकांनी त्याची अनुभूती देखील घेतली आहे. धावपळीच्या आयुष्यात एकदा कमलगट्टाचे हे सोपे उपाय करून पहा, जे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण करू शकता…
3 / 7
व्यवसायात प्रगतीसाठी दुकान, कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी छोट्याशा देव्हाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याला कलमगट्टेचा हार घाला आणि नंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करा. असे केल्याने व्यवसायात चांगली प्रगती होते आणि देवी लक्ष्मीची कृपाही राहते.
4 / 7
शुक्रवारी कमळाच्या बियांची अर्थात मखाणाची खीर आणि कमलगट्टेची माळ देवी लक्ष्मीला अर्पण करा. देवीला लक्ष्मी मातेला तिच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केल्याने ती नक्कीच प्रसन्न होईल आणि तिच्या कृपाशीर्वादाने आर्थिक समस्या दूर होतील तसेच नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होईल.
5 / 7
श्री जगत्प्रसुते नमः मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ कमलगट्टाच्या माळेने केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते. सोबतच माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा या माळेने जप केल्यास माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. शत्रूंपासून बचाव होतो.
6 / 7
शुक्रवारी मखणाच्या १०८ बिया आणा आणि तूप किंवा मधात भिजवा. यानंतर छोटासा यज्ञ करून त्या बियांची १०८ वेळा आहुती द्या. हा उपाय २१ दिवस सतत करा. असे केल्याने घरात सुख-शांती राहते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच हळूहळू आर्थिक संकटही दूर होते.
7 / 7
कमलगट्टा माता लक्ष्मीसमोर ठेवा आणि विधिवत प्रार्थना करा. यासोबत कमलगट्टाच्या माळा घालून कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यानंतर कमलगट्टाला कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही!
टॅग्स :Astrologyफलज्योतिष