Astrology Tips: Must do 'this' remedy to get Lakshmi on Friday of Shakambhari Navratri!
Astrology Tips: शाकंभरी नवरात्रीच्या शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी 'हे' उपाय अवश्य करा! By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 1:14 PM1 / 6नवरात्रीत आपण देवीची उपासना करतो. वर्षभरात तीन नवरात्री आपण साजरी करतो. चैत्र, शारदीय आणि शाकंभरी नवरात्र. देवीची उपासना करण्यासाठी हा व्रतोत्सव असतो. ही उपासना करताना पुढील गोष्टींची जोड द्यावी असे ज्योतिष शास्त्राने सुचवले आहे. 2 / 6शुक्रवारी स्वयंपाकात वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा. शेवया, रवा, तांदूळ, मखाणा यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता. हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखाद्या सवाष्ण स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभाशीर्वाद लाभतील.3 / 6शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह शुक्र ग्रहाला समर्पित आहे आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव पांढर्या खाद्यपदार्थांवर मानला जातो. शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करते.4 / 6शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या, जोडवी, हळद- कुंकू यांसारखे सौभाग्य अलंकार द्या. संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करून लक्ष्मीला खडीसाखर अर्पण करावी. त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान यथाशक्ती आर्थिक दान करा. हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.5 / 6शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याचा पाण्यात चिमूटभर वेलची पूड घाला. दर शुक्रवारी हा उपाय करा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल.6 / 6लक्ष्मी माता ही वैभव संपन्न देवता आहे. तिला अत्तराचा सुगंध प्रिय आहे. म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या. तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती वाढेल. आणखी वाचा Subscribe to Notifications