शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astrology Tips: दुर्गाष्टमीनिमित्त जाणून घ्या श्रीयंत्राची अचूक माहिती; होईल धनलाभ मिटेल आर्थिक ऱ्हासाची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 7:00 AM

1 / 6
आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. कारण सगळी सोंगं घेता येतात पण पैशांचे सोंग घेता येत नाही. म्हणून संसाराला हातभार लागेल एवढे उत्पन्न मिळावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र कधी कधी अनावधाने आपल्या हातून काही चुका घडतात, ज्यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होते. त्याचा परिणाम घराच्या आर्थिक स्थितीवर होतो. अशा नकळत झालेल्या चुका देवीने पदरात घ्याव्यात म्हणून तिचे प्रतीक मानले जाणारे श्रीयंत्र याची नियमित पूजा केलीजाते .
2 / 6
तुम्हीसुद्धा घरात श्रीयंत्र आणणार असाल तर त्याआधी ज्योतिष शास्त्राने दिलेले नियम जाणून घ्या. या नियमांसह श्रीयंत्राची स्थापना केल्यास भक्तांना शुभ फळ मिळते. योग्य नियमांचे पालन केल्यावरच तुम्हाला उपासनेचे पूर्ण फळ मिळते. म्हणूनच श्रीयंत्राशी संबंधित नियमांबद्दल जाणून घेऊया.
3 / 6
ज्योतिषी सांगतात की कोणतेही शुभ आणि धार्मिक कार्य शुभ मुहूर्ताशिवाय करू नये. अन्यथा, व्यक्तीच्या कामात अडथळे येतात किंवा त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. त्याचप्रमाणे श्रीयंत्राच्या स्थापनेपूर्वीच्या शुभ मुहूर्ताबद्दल एखाद्या चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेणे लाभदायक ठरते.
4 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि तिथेच ते ठेवावे. इतर देवतांप्रमाणे श्रीयंत्राचीही पूजा करावी. मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे आवडते वार असल्याने या दिवशी देवी लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची पूजा केल्यास शुभ फळ मिळते.
5 / 6
श्री यंत्राची पूजा लोभाच्या भावनेने न करता सुख-शांतीच्या भावनेने करावी. कारण संपत्तीपेक्षा समाधान जास्त महत्त्वाचे असते. जिथे समाधान असते तिथे संपत्ती नांदते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी स्नान झाल्यानंतर ताम्हन घेऊन त्यात श्रीयंत्र स्थापित करावे. यानंतर श्रीयंत्राला पंचामृत दूध, दही, मध, तूप, साखर इत्यादींनी अभिषेक घालून स्वच्छ पाण्याने स्नान करावे. यानंतर लाल चंदन, लाल फुले वाहून लाल वस्त्रावर त्याची स्थापना करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. धूप, दिवा, कापूर लावून देवीची आरती करावी.
6 / 6
एवढेच नाही तर श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र, श्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ केल्यास फायदा होईल. अशी सगळी पूजा शुक्रवारी केलीत की कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी ते श्रीयंत्र लाल वस्त्रासहित तिजोरीत ठेवावे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष