Astrology Tips: Take Remedies as Recommended by Astrology on Friday Night and Get Wealthy!
Astrology Tips: शुक्रवारी रात्री ज्योतिषशास्त्राने सांगितलेले उपाय करा आणि धनसमृद्धी मिळवा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 3:52 PM1 / 7शुक्रवार तंत्र साधनेसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवशी धनाची देवी लक्ष्मी हीची पूजा केली जाते. त्यामुळे भौतिक सुख, ऐश्वर्य, वैभव, सौंदर्य इत्यादी गोष्टींचा लाभ होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी, सांसारिक इच्छा आणि शारीरिक सुख प्राप्तीसाठी काही अत्यंत गुप्त ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत.2 / 7हे उपाय शुक्रवारी रात्री गुप्तपणे केले जातात, जेणेकरून त्यांचे शुभ परिणाम मिळू शकतील. हे ज्योतिषीय उपाय केल्याने आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि सुख-समृद्धी कायम राहते.3 / 7संपत्ती, समृद्धी आणि आनंदासाठी शुक्रवारी मध्यरात्री अष्ट लक्ष्मीची (माता लक्ष्मीची आठ रूपे) विधिवत पूजा केल्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करा. तसेच गुलाबाची फुले अर्पण करा आणि केशरयुक्त खीर अर्पण करा. ही पूजा करण्याआधी घरच्यांना कल्पना द्या, जेणेकरून तुम्ही पूजेला बसल्यावर त्यात अडथळा येणार नाही. त्यादृष्टीनेच मध्यरात्रीची वेळ सांगितली आहे. रात्री साधारण १२ ते १ दरम्यान ही पूजा करावी.4 / 7शुक्रवारी रात्री स्वच्छ वस्त्रे परिधान करून माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ‘ऐं ह्रीं श्री अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे अगच्छगच्छ नमः स्वाहा’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा आणि श्री लक्ष्मी सूक्ताचा पाठ करावा. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल.5 / 7शुक्रवारी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीसमोर बसून तुपाचा दिवा लावा. यानंतर प्लॅस्टिकचा छोटा डबा मीठाने भरून लाल कापडावर ठेवा. त्यानंतर माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा एक हजार वेळा जप करा. यानंतर मिठाच्या डब्यात लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करा. आरतीनंतर तो छोटा डबा लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाट सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे १० शुक्रवार करा. या उपायाने धन आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आयुष्यात आनंद प्रस्थापित होतो.6 / 7शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा आणि गरजू व्यक्तीला साखर दान करा. तसेच लहान मुलीला बत्तासे खाऊ म्हणून द्या. असे केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती सुधारते आणि भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होते. यासोबतच नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.7 / 7शुक्रवारी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गुलाबी रंगावर कापडावर ठेवा आणि श्रीयंत्र जवळ ठेवा. त्यानंतर पूजेच्या ताटात ८ तुपाचे दिवे लावा आणि सुगंधी अगरबत्ती लावा. बत्तासे नैवेद्यात ठेवा. यानंतर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीला अष्टगंधाने टिळा लावा आणि आरती करा. त्यानंतर कमळ बियांच्या हाराने 'ऐं ह्रीं श्री अष्टलक्ष्मीये ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छगश्च नमः स्वाहा.' मंत्राचा १०८ वेळा जप करा. नामजप केल्यानंतर घराच्या आठही दिशांना ते दिवे लावा आणि कमळाच्या बियांची माळ तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. माता लक्ष्मीची प्रार्थना करा. या उपासनेने संतुष्ट होऊन माता लक्ष्मी कृपा करते असे ज्योतिष शास्त्र सांगते. आणखी वाचा Subscribe to Notifications