शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astrology: जे ठरवतात, ते मिळवतात; पुढचा जन्म मिळावा तर 'या' कर्तृत्त्ववान राशींमध्ये; यात तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 2:44 PM

1 / 5
वृषभ राशीचे लोक खूप मेहनती असतात आणि प्रत्येक काम पूर्ण समर्पणाने करतात. करिअरच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि वेगाने प्रगती करतात. याच जोरावर त्यांना विलासी जीवन मिळते आणि ते अमाप संपत्तीचे मालक बनतात. हे लोक खूप कमी वयात खूप नाव कमावतात.
2 / 5
कर्क राशीचे लोक मेहनती आणि चांगले नेते असतात. ते मल्टीटास्किंग देखील असतात. ज्या कामाला सुरुवात करतात ते काम तडीस नेऊन मगच दम घेतात. हे लोक कमी वयात खूप प्रगती करतात. या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीही मिळते आणि ते आरामदायी जीवन जगतात.
3 / 5
सिंह राशीचे लोक निडर, धैर्यवान आणि उत्कृष्ट नेते असतात. त्यांचे व्यक्तिमत्व मजबूत आणि आकर्षक असते. यामुळे ते खूप लोकप्रिय असतात आणि लहान वयातच त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. संपत्ती असो वा नसो ते आहे त्या स्थितीत राजासारखे वैभवसंपन्न आयुष्य जगतात.
4 / 5
वृश्चिक राशीचे लोक आपले ध्येय साध्य करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व धोरणांचा अवलंब करतात. हे लोक त्यांच्या कामात समर्पित असतात. ते गरीब कुटुंबात जन्माला आले तरी आपल्या प्रयत्नांच्या जोरावर श्रीमंती उपभोगतात. या कारणांमुळे या लोकांची प्रगती वेगाने होते.
5 / 5
मकर राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव असतो. ते खूप मेहनती, प्रामाणिक आणि उत्साही असतात. ते जे ठरवतात ते मिळवतात. या लोकांना त्यांच्या गुणांमुळे मान सन्मान आणि यश देखील मिळते. ही शनीची रास असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी उशिरा मिळतात, पण त्या मिळेपर्यंत हे लोक हार मानत नाहीत!
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य