शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयुष्मान राजयोग: ५ राशी लकी, नव्या नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, बिझनेसमध्ये फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 7:07 AM

1 / 9
नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर वृश्चिक राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध वृश्चिक राशीत विराजमान झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बुध पुन्हा एकदा राशीपरिवर्तन करणार आहे.
2 / 9
दिवाळीनंतर नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे सूर्य, बुध आणि मंगळ या तीन ग्रहांचा त्रिग्रही योग वृश्चिक राशीत जुळून येत आहे. मंगळ, सूर्य आणि बुध ग्रहांच्या वृश्चिक राशीतील शुभ संयोगामुळे आयुष्मान राजयोग तयार होत आहे.
3 / 9
तसेच बुध आणि मंगळ यांच्या वृश्चिक राशीतील युतीमुळे धनयोग जुळून येत आहे. वृश्चिक रास ही मंगळाची स्वरास असल्यामुळे या राशीत मंगळ ग्रह अधिक पराक्रमी होतो, असे सांगितले जाते. या राजयोगाच्या प्रभावामुळे ५ राशींना दिवाळीनंतर लाभ मिळत राहू शकतील, असे सांगितले जात आहे.
4 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्मान राजयोग शानदार ठरू शकेल. सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. आत्मविश्वास खूप चांगला असेल. नोकरदार महिलांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. घर आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील. व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होऊ शकाल. शक्य असल्यास नियमितपणे सूर्याची उपासना करा आणि दररोज सूर्याला अर्घ्य द्या.
5 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्मान राजयोग सुखकारक ठरू शकेल. एखादी चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेच्या बाबतीत हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा घर विकायचे असेल तर करार निश्चित होऊ शकतो. प्रवासातून यश मिळेल. जवळचे मित्र आणि कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. शक्य असेल तर नियमितपणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे.
6 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना आयुष्मान राजयोग भाग्यकारक ठरू शकेल. मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. करिअरशी संबंधित प्रवासात यश मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला वेळ मिळेल. मंगळवारी हनुमंतांचे दर्शन घ्यावे आणि नामस्मरण करावे.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना आयुष्मान राजयोग शुभ ठरू शकेल. जोडीदाराकडून प्रत्येक बाबतीत पूर्ण सहकार्य मिळेल. जास्तीत जास्त वेळ धार्मिक आणि शुभ कार्यात घालवू शकाल. परदेशाशी संबंधित काम आणि व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. काही वस्तू खरेदी कराल ज्यांचा खूप दिवसांपासून विचार करत होता. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मंगळवारी हनुमानजींना लाल गुलाब अर्पण करा.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्मान राजयोग आनंददायक ठरू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. परदेशात व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्यांना समस्यांतून दिलासा मिळू शकेल. एखादा व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. मान-सन्मान वाढेल. मेहनतीमुळे करिअरमध्ये प्रतिष्ठा मिळेल. शक्य असल्यास दररोज भगवान शिवाला अभिषेक करा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य