शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरातील रोजची भांडणं कमी करण्यासाठी वास्तू शास्त्रात दिलेल्या सोप्या टिप्स जरूर वापरून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 3:17 PM

1 / 5
>> घरात चंदनाची कोणतीही मूर्ती ठेवा. मात्र ती अशा दर्शनीय ठिकाणी ठेवा, जिथे सासू सूनेचेच नाही, तर घरातल्या प्रत्येक सदस्याची नजर जाईल. चंदनाच्या मूर्तीच्या दर्शनामुळे त्या मूर्तीची शीतलता बघणाऱ्याच्या नजरेत उतरते आणि मन शांत होऊन मनातील अढी दूर होते.
2 / 5
>> स्वयंपाक घराचा रंग उग्र नसावा. सासू सुनेचा अधिकतर वेळ स्वयंपाक घरात जातो. आधीच उद्विग्न झालेल्या मनावर घरातील गडद रंगसंगतीचा विपरीत परिणाम होतो. त्यात स्वयंपाक घरात सतत पसारा, चूल आणि मूल यांचा सतत वावर यामुळे ती जागा सतत वापरात असते. तो परिसर सौम्य आणि प्रसन्न रंगाचा असेल तर घरातील महिला वर्गाची मनःस्थिती उत्तम राहते.
3 / 5
>> घरात नवरा बायकोचे, कुटुंबाचे, मुलांचे छायाचित्र लावतो. ते केवळ शोभा वाढवण्यासाठी नाही, तर ते छायाचित्र आपल्याला सतत आपल्यातील ऋणानुबंधांची आठवण करून देत असते. त्याचप्रमाणे सासू आणि सुनेचे छायाचित्र छान फ्रेम करून एखाद्या भिंतीवर लावा. त्याचाही त्या दोघींच्या नात्यावर सकारात्मक परिणाम नक्कीच पडेल.
4 / 5
>> सासू सुनेच्या खोलीत नदीचे तसेच वाहत्या झऱ्याचे चित्र लावावे. त्यामुळे वाहत्या पाण्याप्रमाणे मनातील दूषित विचार वाहून जातील आणि नात्यात पारदर्शकता येण्यास मदत होईल.
5 / 5
>> दिवसातील एक जेवण तरी घरच्यांनी एकत्र घ्या. त्यावेळेस टीव्ही, मोबाईल पाहू नका. सगळ्यांची संवादाची देवाण घेवाण झाली तर संवादामुळे नाते घट्ट होईल आणि मनातील किल्मिष दूर होऊन जाईल. तसेच घरातल्या लहान मुलांवर आदर्श कुटुंबाचा संस्कार होईल.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र