Beware! Remember that if you have 'these' five habits, You may face poverty!
सावधान! तुम्हाला जर 'या' पाच सवयी असतील तर दारिद्रय हात धुवून पाठी लागू शकते! By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:45 AM1 / 5 'लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे' असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते. म्हणून म्हणून उशिरा उठणे टाळा! अन्यथा कितीही मेहनत घेतलीत तरी अपयश आणि दारिद्रय तुमची पाठ सोडणार नाही हे नक्की!2 / 5आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण बालपणी शिकलो, परंतु त्याच्यापासून दूर राहणे आपण शिकलो नाही तर दारिद्रयाशी हातमिळवणी झालीच म्हणून समजा! आळसामुळे आपली प्रगती थांबते, ध्येय दूर जाते आणि जगण्याला उद्दिष्ट राहात नाही. त्याला आपण नैराश्य म्हणत कुरवाळू लागतो. परंतु शास्त्र सांगते जो अकार्यक्षम असतो तोच नैराश्येच्या गर्तेत जातो. जो स्वतःची मदत करू शकत नाही त्याची मदत दुसरे कोणीही करू शकत नाही. म्हणून आळस झटका आणि कामाला लागा!3 / 5कपडे महाग आहेत की स्वस्तातले हे महत्त्वाचे नसून ते स्वच्छ असणे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या कपड्यांवरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडते तसेच आपला आत्मविश्वास दुणावतो. मळके, चुरगळलेले, फाटके कपडे पाहून कोणीही आपल्याला जवळ करत नाही. यासाठीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे कपडे परिधान करावेत. ते नीट नेटके असावेत. स्वच्छ असावेत. ते परिधान केल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटले पाहिजे. 4 / 5काही लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात. त्यांच्या लेखी दुसऱ्यांना काहीच येत नाही. या गैरसमजापोटी ते त्यांचा अपमान करतात, कमी लेखतात. अशा गर्विष्ठ लोकांशी कोणी मैत्री करत नाही. त्यामुळे हे लोक स्वतःच्या प्रगतीत स्वतःच अडथळा निर्माण करतात. याउलट जे लोक स्वतः बरोबर इतरांच्या प्रगतीचा विचार आणि कृती करतात त्यांची प्रगती आपोआप होत जाते. म्हणून विद्यार्थी दशेत राहून प्रत्येकाचा चांगला गुण घेऊन स्वतःचा उत्कर्ष करणे केव्हाही चांगले!5 / 5ज्या लोकांना स्वतःची, घराची स्वच्छता राखता येत नाही असे लोक आपल्या कामातही नीटनेटकेपणा आणू शकत नाहीत. या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही. एवढेच काय तर लक्ष्मी माताही अशा घरांकडे फिरत नाही. तसेच अशा लोकांच्या हाती लक्ष्मी टिकत नाही. कारण खर्च करण्याबाबतीतही त्यांना नेटकेपणाने व्यवहार जमत नाही. यासाठीच आपल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आपण डोळसपणे लक्ष द्यायला हवे. अस्वच्छता दूर करायला हवी, घरातली, शरीरातली आणि मनातलीदेखील; तर आणि तरच तुमचा सर्वार्थाने उत्कर्ष होऊ शकेल आणि दारिद्रयापासून तुमची सुटका होऊ शकेल! आणखी वाचा Subscribe to Notifications