शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुधाचा अस्त: ‘या’ ४ राशींनी राहावे सतर्क, प्रतिकूल काळ; १८ दिवस महत्त्वाचे, बजेट सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:22 AM

1 / 9
नवग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत विराजमान आहे. काहीच दिवसांपूर्वी बुध ग्रहाने या राशीत प्रवेश केला होता. आता याच वृषभ राशीत बुध अस्तंगत होणार आहे. २२ जून रोजी बुध वृषभ राशीत अस्तंगत होत असून, १० जुलै रोजी बुधाचा उदय होईल.
2 / 9
एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. आताच्या घडीला सूर्य आणि बुध वृषभ राशीत जवळच्या अंशावर आल्यामुळे पृथ्वीवरून दिसणार नाही. म्हणजेच बुध ग्रह अस्तंगत होईल.
3 / 9
तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते. काही दिवसांनी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर २४ जून रोजी बुधही मिथुन राशीत विराजमान होणार आहे.
4 / 9
विशेष म्हणजे वृषभ राशीत अस्तंगत झालेला बुध मिथुन राशीत उदय होणार आहे. बुध आणि सूर्य मिथुन राशीत एकमेकांपासून लांबच्या अंतरावर गेल्याने १० जुलै रोजी बुधचा उदय होणार आहे. वृषभ आणि मिथुन राशीत सूर्य आणि बुध असल्याने शुभ असा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे.
5 / 9
मात्र, बुध अस्तंगत होणे काही राशीच्या व्यक्तींसाठी प्रतिकूल ठरू शकते, असे सांगितले जात आहे. या काळात विशेष काळजी घ्यावी लागू शकते. सतर्क राहून व्यवहार करावे लागू शकतात, संमिश्र काळ ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या ४ राशींना बुध अस्तंगत होणे आर्थिक, करिअरच्या बाबतीत आव्हानात्मक ठरू शकते? जाणून घेऊया...
6 / 9
वृषभ राशीत बुधाचा अस्त होत आहे. अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्चात वाढ होऊ शकते. घरगुती समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. करिअरमधील प्रगतीच्या संधी कमी होऊ शकतात. घरगुती कलह वाढू शकतो. या काळात आरोग्याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
7 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधाचे अस्तंगत होणे संमिश्र ठरू शकते. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधांवरही परिणाम होऊ शकतो. नाती टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि सामंजस्य ठेवणे हिताचे ठरू शकेल. करिअरमधील प्रगती आणि उत्पन्नामध्ये समस्या असू शकतात. आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम झाल्यामुळे बचत करणे शक्य होणार नाही. बजेटची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
8 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाचा अस्त संमिश्र ठरू शकेल. जीवनात प्रतिकूल परिणाम जाणवू शकतील. नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही. कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला सर्व योजना अत्यंत काळजीपूर्वक बनवाव्या लागतील. आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. खर्चावर लक्ष ठेवा.
9 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचे अस्तंगत होणे संमिश्र ठरू शकते. नशिबाची साथ कमी मिळेल. ध्येय साध्य करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. प्रवासात काळजी घ्या. आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याबाबत तुम्ही थोडे तणावात राहू शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य