शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budh Gochar 2023: बुधाचे मीन राशीत गोचर; आजपासून 'या' पाच राशींची कमाई वाढणार, होणार अपार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:31 AM

1 / 7
१६ मार्च म्हणजेच आज बुधाच्या मीन राशीतील प्रवेशामुळे काही राशींना मोठा लाभ होणार आहे. बुध आणि सूर्य मिळून बुधादित्य योग तयार होईल. यासोबतच गुरू देखील आपल्या राशीत मीन राशीत आहे.
2 / 7
बुध, गुरु आणि सूर्य हे तिन्ही ग्रह अशा प्रकारे त्रिग्रही योग तयार करतील. अशा स्थितीत वृषभ आणि मिथुन व्यतिरिक्त इतर ५ राशींसाठी हा योग अतिशय शुभ आणि लाभदायक असेल.
3 / 7
वृषभ - बुधाचा हा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जात आहे. या बुधादित्य योगामुळे तुम्हाला अपार लाभ आणि तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी यशस्वी ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीत उत्तम संधी मिळू शकतात. मात्र, यावेळी तुमचे खर्च खूप वाढण्याची शक्यता आहे. या क्षणी तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करू नये आणि आकस्मिक परिस्थितींसाठी काही पैसे वाचवले पाहिजेत.
4 / 7
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचा हा प्रवेश व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. राशीस्वामी बुध दशम भावात बुधादित्य योग तयार करेल, जो तुमच्या कामाच्या दृष्टीने चांगला राहू शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी, हा काळ व्यवसायात नवीन संधी प्रदान करू शकतो. तुम्ही नवीन व्यवसाय सुरु विचार करू शकता किंवा तुम्ही यावेळी नवीन करार करू शकता. यामुळे तुम्हाला भविष्यात शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे.
5 / 7
कन्या - या काळात शुभ प्रभावामुळे लोकांना लव्ह लाईफ आणि पार्टनरशिपच्या कामात चांगले परिणाम मिळू शकतील. तुमच्या राशीच्या सातव्या घरातील बुधादित्य योग भागीदारी, मैत्री आणि कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम देऊ शकतो. आर्थिक आणि व्यवसायातही तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. यावेळी, जर तुम्हाला भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आणि यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमच्या प्रेमजीवनात आणि वैवाहिक जीवनातही आनंद निर्माण होईल.
6 / 7
वृश्चिक - या कालावधीत वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात करिअर आणि शिक्षणाच्या बाबतीत विशेष यश मिळू शकते. बुधाच्या या प्रवेशानं तुमच्या राशीच्या पाचव्या भावात बुधादित्य योग तयार होईल, जो तुमच्या प्रेम जीवनात अनुकूलता आणू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे स्पर्धेत यश मिळू शकते. ज्यांनी नुकतीच कोणत्याही सरकारी नोकरीत यश मिळविण्यासाठी कोणतीही परीक्षा दिली आहे, त्यांना यावेळी यश मिळण्याची शक्यता आहे.
7 / 7
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी बुधाचा हा प्रवेश तुमच्या जीवनातील सुख-सुविधा वाढवणारं ठरू शकतं. तुमच्या राशीच्या चौथ्या घरात बुधादित्य योग सुखाची साधने वाढवू शकतो. मातृपक्षाकडून सुख व लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला वाहन सुखही मिळू शकेल. यावेळी तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता. तुमच्यावरील कामाचा ताण कमी होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य