शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुध गोचराने ४ ग्रहांशी युती योग: १० राशींना लाभच लाभ, पैशांचा ओघ वाढेल; भरघोस भरभराट काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:17 IST

1 / 15
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांपैकी बुध आणि शुक्र ग्रहाला खूप महत्त्व आहे. एकीकडे, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह वाणी, बुद्धी, विवेक, निर्णय घेण्याची क्षमता, वादविवाद, शिक्षण आणि व्यवसायाचा कारक मानला जातो, तर दुसरीकडे, शुक्र ग्रह धन, समृद्धी, आनंद, सौंदर्य, विलासिता, प्रेम, आकर्षण इत्यादींचा कारक मानला जातो. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी बुध मीन राशीत प्रवेश करत आहे.
2 / 15
बुध ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशानंतर शुक्राशी युती होऊन लक्ष्मीनारायण योग जुळून येऊ शकेल. मीन राशीचा स्वामी गुरू आहे. बुध आणि गुरु मित्र ग्रह मानले जातात. याचा सकारात्मक प्रभाव आणि परिणाम पाहायला मिळू शकेल. तसेच मीन राशीत प्रवेश केल्यानंतर बुधाचा ४ ग्रहांशी योग जुळून येणार आहे.
3 / 15
मीन राशीत विद्यमान घडीला शुक्र, राहु आणि नेपच्यून ग्रह विराजमान आहे. या तीन ग्रहांशी बुधाचा युती योग जुळून येणार आहे. तर केतु आताच्या घडीला कन्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे बुध आणि केतुचा समसप्तक योग जुळून येत आहे.
4 / 15
मीन ही शुक्र ग्रहाची उच्च रास आहे. बुध ग्रहाचा मीन राशीत होत असलेला प्रवेश अनेक राशींसाठी सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट लाभाचा ठरू शकेल. अनेक राशींना नोकरी, व्यवसाय, कुटुंब, शिक्षण यात सकारात्मक अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
5 / 15
वृषभ: उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकेल. कुटुंबात आनंद आणि शांततेचे वातावरण राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. केलेली गुंतवणूक चांगला नफा देऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा, किंवा लॉटरी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.
6 / 15
मिथुन: बुधाचे गोचर शुभ ठरू शकते. या काळात कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कारकिर्दीत नवीन आयाम येऊ शकतात. व्यावसायिकांसाठी फायदेशीर काळ राहील. नवीन ग्राहक आणि व्यावसायिक संबंधांचा फायदा होईल.
7 / 15
कर्क: भौतिक सुखे मिळू शकतात. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. बुध ग्रहाच्या कृपेने बौद्धिक क्षमतेत सुधारणा होऊ शकते. अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. अध्यात्माकडे कल लक्षणीयरीत्या वाढू शकतो. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत जाऊ शकता. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. घर, वाहन खरेदी करण्यात किंवा घराचे नूतनीकरण इत्यादी करण्यात यशस्वी होऊ शकता. नशीब पूर्णपणे बाजूने असेल.
8 / 15
कन्या: लक्ष्मी नारायण राजयोग सकारात्मक ठरू शके. प्रेम आणि रोमान्स अधिक असणार आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. जोडीदाराकडून आर्थिक लाभ मिळू शकतात. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल.
9 / 15
तूळ: बुधाचे गोचर आणि ४ ग्रहांशी होत असलेला युती योग अनुकूल ठरू शकतो. दीर्घकालीन आजार दूर होऊ शकतात. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत आता चांगला नफा मिळू शकतो. पैशांचा ओघ अचानक वाढू शकतो. कामातील प्रत्येक अडथळा दूर होऊ शकतो.
10 / 15
वृश्चिक: बुधाचे गोचर आणि ४ ग्रहांशी युती योग चांगला ठरू शकतो. प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. आनंदाचे वातावरण राहू शकेल. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. आरोग्य चांगले राहील.
11 / 15
धनु: विशेष लाभ मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. अनेक आनंद देणाऱ्या घटना घडू शकतात. दीर्घकालीन आजार बऱ्याच प्रमाणात बरे होऊ शकतात. समाजात आदर वाढू शकतो. आर्किटेक्चर, इंटिरिअर डिझाइन, डिझायनिंग किंवा रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढू शकते.
12 / 15
मकर: साहस आणि पराक्रमात वाढ होऊ शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून चांगला नफा होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. या काळात इच्छा पूर्ण होतील. भावंडांकडून पाठिंबा मिळू शकेल. आर्थिक बाबतीत प्रगती होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक होईल. व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्ताने होणारे प्रवास फायदेशीर ठरतील.
13 / 15
कुंभ: बुधाचे गोचर आणि ४ ग्रहांशी युती योग फायदेशीर ठरू शकतो. मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकतो. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. पदोन्नती मिळू शकते. आत्मविश्वासात झपाट्याने वाढ दिसून येऊ शकेल. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल.
14 / 15
मीन: बुधाचे या राशीत होत असलेले गोचर आणि चार ग्रहांशी होणारी युती फायदेशीर ठरू शकेल. आत्मविश्वास वाढेल. कालांतराने लोकप्रिय व्हाल. या काळात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल. भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकेल. या काळात तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळतील. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे. प्रेम जीवनातही सुधारणा होईल. संपत्ती, प्रसिद्धी आणि यशाच्या संधी मिळू शकतात.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक