शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुध गोचराने दुर्मिळ योग: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामे होतील; थकीत पैसा मिळेल, यशाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 3:03 PM

1 / 9
ग्रहस्थिती अशी गुरू आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, मंगळ, शुक्र, प्लूटो आणि बुध मकरेत आहे. १९ फेब्रुवारीला बुध कुंभेत जाईल. तेथे त्याची युती रवी आणि शनी यांच्याशी होईल. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिह राशीतून राहील.
2 / 9
मंगळवारी जया एकादशी, बुधवारी प्रदोष आणि भीष्म द्वादशी, गुरुवारी गुरुपुष्यामृत, तर शनिवारी माघ स्नान समाप्ती आहे. बुधाचा कुंभ राशीतील प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. बुध कुंभ राशीत विराजमान झाल्यावर बुधादित्य आणि त्रिग्रही योग जुळून येत आहे. आगामी काही दिवस या दोन्ही योगांचा शुभ लाभ काही राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल.
3 / 9
बुधाचे गोचर, आगामी काही दिवसांतील शुभ दिवस, एकादशी, गुरुपुष्यामृत योग, प्रदोष आणि एकूणच ग्रहस्थिती ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम फलदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडी, कुटुंब, व्यापार, शिक्षण, करिअर, वैवाहिक जीवन अशा आघाड्यांवर कसा प्रभाव दिसू शकेल? जाणून घ्या...
4 / 9
मेष: नशिबाची आणि भाग्याची साथ मिळू शकेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे मित्रांच्या, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होतील. विरोधकांचाही पाठिंबा मिळू शकेल. अडकलेली कामे सहजतेने पूर्ण होण्याची शक्यता आहे. एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळू शकतात. काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी असू शकेल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल.
5 / 9
मिथुन: यश संपादन करण्याची उत्तम संधी मिळू शकेल. व्यवसायात प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. अपेक्षित नफा आणि यश मिळू शकेल. नोकरदारांना अनुकूल काळ आहे. एकूणच आगामी काळ काहीसा व्यस्त असू शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल. जोडीदाराकडून प्रत्येक बाबतीत पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना चांगला काळ ठरू शकेल.
6 / 9
सिंह: आगामी काळ शुभ ठरू शकेल. जे काम हातात घ्याल, त्यात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. बरेच सकारात्मक बदल दिसतील. नशिबाची आणि भाग्याची साथ लाभू शकेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ फायदेशीर ठरू शकेल. अनेक आर्थिक लाभ मिळू शकतात. नोकरदारांना इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळू शकते. परदेशात जायचे आहे, मार्गातील सर्व अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.
7 / 9
तूळ: ठरवलेली सर्व कामे पूर्ण होतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरी बदलाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. चांगली ऑफर मिळू शकेल. अचानक एखाद्या धार्मिक स्थळी किंवा जवळच्या मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. कुटुंबात काही वाद असल्यास वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने सोडवू शकतात. लव्ह लाईफसाठी शुभ काळ ठरणार आहे.
8 / 9
कुंभ: या राशीत बुध गोचर होत असून, सूर्य आणि शनीसह त्रिग्रही योग जुळून आला आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकेल. शत्रूंवर विजय मिळेल. कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य