शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२६ ऑक्टोबरला बुधचा राशीबदल: ‘या’ ४ राशींना अपार यश, प्रगती अन् धनलाभ; दिवाळीनंतरही दिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 3:34 PM

1 / 9
ऑक्टोबर महिन्याची सांगता व्हायला अवघे काही दिवस राहिलेले आहेत. देशभरात दिवाळीची मोठी धूम पाहायला मिळत आहे. मोठ्या जल्लोषात आणि हर्षोल्लासात दिवाळ सण साजरा केला जात आहे. मात्र, दिवाळीनंतरही काही व्यक्तींची दिवाळी सुरूच राहणार आहे. याचे कारण नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. (budh transit in tula rashi 2022)
2 / 9
बुध ग्रह आपले स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी बुधचे राशीपरिवर्तन होणार आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत बुध तूळ राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. (mercury transit in libra 2022)
3 / 9
१९ नोव्हेंबरनंतर बुध तूळ राशीतून पुढे वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी बुधचा तूळ राशीत होत असलेला प्रवेश काही राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ, लाभदायक मानला जात आहे. तूळ राशीत बुधाच्या प्रवेशाने चार ग्रहांचा अनोखा संयोग तयार होईल. वास्तविक या काळात तूळ राशीमध्ये बुधासोबत सूर्य, शुक्र आणि केतूही असतील.
4 / 9
तूळ राशीत बुधाच्या प्रवेशामुळे अनेक राशींना खूप फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींना बुधचे संक्रमण त्यांच्या आयुष्यात अपार आनंद देईल. चार ग्रहांच्या या अद्भूत संयोगाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. या काळात तुम्हाला क्षेत्रात अनुकूल संधी मिळू शकतात. तुमचे उत्पन्न वाढू शकेल. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होऊन त्यांचे लक्ष शिक्षणाकडे अधिक केंद्रित होईल. या काळात तुमच्या घरात तुमचा आदर वाढू शकेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश यशकारक ठरू शकेल. कुटुंबात शांततेचे वातावरण असू शकेल. नोकरीच्या ठिकाणी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात नोकरदारांचे उत्पन्न वाढू शकते. व्यापारी वर्गाला अनेक चांगले सौदे मिळू शकतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासूनही मुक्तता होऊ शकेल.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. भावंडांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकतील. तुमच्या बोलण्यालाही घरात महत्त्व दिले जाईल. नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला चांगल्या लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होऊ शकाल. समाजात लोकप्रियता वाढेल.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना बुधचा तूळ प्रवेश लाभदायक ठरू शकेल. या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. जुन्या पैशांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल. तुमचे कौटुंबिक जीवन शांत आणि समृद्ध होऊ शकेल. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
9 / 9
बुध ग्रहाच्या तूळ राशीतील प्रवेशानंतर लक्ष्मी नारायण योग, बुधादित्य योग असे अनेक शुभ योग जुळून येणार असून, याचाही अनेक राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य