शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budh Uday 2023 : 12 जानेवारीपासून 'या' 3 राशीच्या लोकांचा होणार भाग्‍योदय! बुधाच्या कृपेनं धनाची बरसात होण्याचे योग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 7:55 PM

1 / 6
नऊ ग्रहांपैकी बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. बुध ग्रहाच्या कृपेने व्यक्तीला उच्च पद आणि व्यापारातील लाभासोबतच बुद्धिमत्ताही प्राप्त होते. बुध ग्रहाचा उदय, राशी परिवर्तन आणि अस्त होण्याचा परिणाम सर्वच्या सर्व 12 राशींवरही होत असतो.
2 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट कालावधीनंतर, एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो. या ग्रहांचा वेळोवेळी अस्त होण्याबरोबरच उदयही होत असतो. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अधिक जवळ जातो तेव्हा त्याचा अस्त होतो.
3 / 6
31 डिसेंबर 2022 रोजी बुध अस्त झाला होता. साधारणपणे 12 दिवस बुध अस्त राहील. व्यवसाय, बुद्धी आणि तर्क यांचे कारक असलेले बुधाचा 12 जानेवारी 2023 रोजी उदय होईल. याचा तीन राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे.
4 / 6
सिंह रास - सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायक ठरेल. या काळात आपल्याला आर्थिक आघाडीवर लाभ मिळेल. प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. संतानसुख मिळू शकेल. भावा-बहिणीचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक समस्या दूर होतील.
5 / 6
तुळ रास - वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात बुध ग्रहाचा उदय होत आहे. याचा तूळ राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळेल. या काळात आपले धैर्य आणि पराक्रम वाढेल. आपण जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. शत्रू वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतील. पण आपले नुकसान करू शकणार नाहीत. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असेल.
6 / 6
धनु रास - धनु राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय शुभ फलदायी ठरेल. या काळात आपल्या व्यवसायाला गती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आपल्या कामाचे कौतुक होईल. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात तुम्हाला फायदा होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य