शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 3:21 PM

1 / 12
ज्योतिषशास्त्रात बुधाला नवग्रहांचा राजकुमार ग्रह मानले गेले आहे. २६ नोव्हेंबर रोजी बुध वृश्चिक राशीत वक्री होत आहे. १५ डिसेंबरपर्यंत बुध ग्रह वक्री असणार आहे. त्यामुळे सुमारे १९ दिवसांचा काळ काही राशींना शुभ-लाभाचा, तर काही राशींना काहीसा खडतर, संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच २९ नोव्हेंबर रोजी वक्री असलेला बुध वृश्चिक राशीतच अस्तंगत होणार आहे.
2 / 12
बुधाचा अस्त काही दिवस असणार आहे. १३ डिसेंबर रोजी बुधाचा उदय होणार आहे. वृश्चिक राशीत सूर्य असून, बुध आणि सूर्य एकमेकांपासून जवळच्या अंशावर गोचर होत असल्यामुळे बुधाचा अस्त होणार आहे. तर १३ डिसेंबर रोजी सूर्य आणि बुध एकमेकांपासून दूरच्या अंतरावरून गोचर करतील, त्यामुळे बुध उदय होईल.
3 / 12
बुध वक्री आणि बुधाचा अस्त काही राशींना चांगला ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तर काही राशींना सावधगिरी बाळगून या काळात कार्यरत राहावे लागेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर बुध वक्री आणि बुध अस्तंगत याचा प्रभाव राहू शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
मेष: आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अभ्यासामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकतात. थोडी काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचे अनावश्यक वादविवाद टाळावेत. भावंडांशी काही मुद्द्यावर वाद होऊ शकतो. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
5 / 12
वृषभ: थोडे सावध राहणे आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक , कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनातील काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. अहंकारवृत्ती वाढू शकते. त्यामुळे नुकसान होऊ शकते. परंतु, कालांतराने व्यवसाय आणि नोकरीमध्ये नवीन सौदे करण्याची संधी मिळेल.आर्थिक स्थितीतही पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा दिसून येईल. विशेष लाभ मिळतील.
6 / 12
मिथुन: कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक स्थितीही चांगली राहणार नाही. व्यावसायिक कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. नोकरदारांना सहकाऱ्यांमुळे कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागू शकतो. काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. जोडीदाराशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
7 / 12
कर्क: काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. लोकांचा विश्वास राहू शकणार नाही. करिअरच्या क्षेत्रात कामाचा मोठा ताण असू शकतो. मेहनतीनुसार कमाई करू शकणार नाही. इगोमुळे वैयक्तिक संबंधांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
8 / 12
सिंह: पैशाशी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. गुंतवणुकीत आणि बचत करण्यात यशस्वी न होण्याची शक्यता जास्त आहे. पैशाशी संबंधित समस्या असू शकतात. अहंकारवृत्ती वाढू शकेल. अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी केवळ पैशांबाबत वाद होऊ शकतात.
9 / 12
तूळ: वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. मार्केटिंग आणि प्रमोशनचे फायदे होऊ शकतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत असेल. जे काही विचार आणि कराल त्यात यशस्वी व्हाल. बोलण्याचा प्रभाव वाढेल. लोक प्रभावित होतील. लेखन, संवाद आणि माध्यमांशी निगडित लोकांसाठी हा काळ चांगला राहू शकेल.
10 / 12
वृश्चिक: विशेष लाभ मिळतील. या काळात वडिलोपार्जित संपत्तीचा आनंद मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात दीर्घकाळ चालत असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करता येऊ शकेल. खाजगी नोकरी करणाऱ्यांना या काळात नवीन संधी मिळू शकतात किंवा अचानक वाढ होऊ शकते. अचानक बढती मिळण्याची शक्यता आहे.
11 / 12
मकर: उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकता. नेतृत्व क्षमता विकसित होईल. काम वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल. गुंतवणुकीच्या नवीन संधी शोधण्यात यशस्वी व्हाल. कठोर परिश्रम करून पैसे कमवू शकाल. शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.
12 / 12
कुंभ: नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नवीन नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात मार्केटिंग आणि प्रमोशनमधून फायदा होईल. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक