शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२५ दिवस बुध वक्री: ‘या’ ५ राशींना शुभ काळ, धनलाभाचे योग; नव्या नोकरीची संधी, बिझनेस बहरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 7:07 AM

1 / 9
नवग्रहांचा राजकुमार असलेला बुध आताच्या घडीला मेष राशीत विराजमान आहे. मेष राशीत २१ एप्रिल रोजी बुध वक्री होत आहे. सुमारे २५ दिवसांनी म्हणजेच १५ मे रोजी बुध मेष राशीत मार्गी होणार आहे. बुध वक्री स्थितीत अनेक राशींना मालामाल करू शकतो, असे सांगितले जात आहे.
2 / 9
विशेष म्हणजे बुध वक्री अवस्थेत असतानाच मेष राशीत अस्तंगत होणार आहे. एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते.
3 / 9
१४ एप्रिल रोजी सूर्याचा मेष राशीत प्रवेश होणार आहे. मेष संक्रांती काळात सूर्य बुधाचा बुधादित्य योग जुळून येणार आहे. या काळात बुध आणि सूर्य अतिशय जवळच्या अंशांवर असतील. त्यामुळे २६ एप्रिल रोजी वक्री असतानाच बुध अस्तंगतही होईल. तर १० मे रोजी सूर्य आणि बुध एकमेकांपासून लांबच्या अंशांवर जातील. त्यामुळे या दिवशी बुधाचा उदय होईल.
4 / 9
बुधाचे वक्री होणे आणि याच काळात अस्तंगत होणे तसेच मेष राशीत मार्गी होण्यापूर्वी बुधचा उदय होणे अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. बुधच्या या चलनाचा ५ राशीच्या मंडळींना मोठा फायदा होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. उत्तम संधीचा हा काळ ठरू शकतो, असेही म्हटले जात आहे. कोणत्या ५ राशींवर बुधाची कृपा होऊ शकेल? जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री होणे अनुकूल ठरू शकेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात. नोकरदारांना चांगले प्रोत्साहन मिळू शकते. व्यवसायातही प्रगती दिसू शकेल. पैशाची चांगली बचत करू शकाल. नोकरीमध्ये नवीन संधी मिळाल्याने पगारात अचानक लक्षणीय वाढ होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या खूप असतील. त्या समजूतदारपणाने पूर्ण करू शकाल. मात्र, जोडीदाराशी भांडण होऊ शकते.
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री होणे लाभदायक ठरू शकेल. प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतील. नवीन संधी मिळू लागतील. कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळू शकेल. कार्यालयातील उच्च अधिकार्‍यांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकतील. व्यापाऱ्यांना व्यवहारांमध्ये लाभ मिळू शकेल. व्यवसायाला नवसंजीवनी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्याही अनुकूल काळ ठरू शकेल. पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकाल. नवीन घर किंवा नवीन कार घेऊ शकता. शक्य असल्यास दररोज ११ वेळा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री होणे अनुकूल ठरू शकेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरमध्ये यश मिळू शकेल. हवे ते काम करायला मिळाले तर आत्मविश्वास मजबूत होईल. करिअरमध्ये प्रत्येक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतील. जे अनेक दिवसांपासून परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांनाही यश मिळू शकते. आर्थिक स्थितीही सुधारू शकेल. बँक बॅलन्सही वाढू शकेल. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण करू शकाल. शक्य असल्यास दर बुधवारी दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री होणे प्रगतीकारक ठरू शकेल. करिअरमध्ये विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास खूप वाढू शकेल. कार्यक्षमता पाहून बॉस कौतुक करू शकतील. करिअरच्या नवीन संधी मिळू शकतील. व्यवसायात भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातही समृद्धी येऊ शकेल.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री होणे यशकारक ठरू शकेल. करिअरमध्ये विशेष यश मिळू शकेल. मेहनतीचे सकारात्मक फळू शकेल. प्रमोशनची शक्यता निर्माण होत आहे. नोकरीसाठी ऑफर येऊ शकते. कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राहिल्याचा फायदा मिळू शकेल. बचत वाढू शकेल. व्यवसायात परदेशी स्त्रोतांकडून नफा मिळू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला जाऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. शक्य असल्यास दररोज किमान २१ वेळा ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य