शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२ महिने शुभ होईल! बुधचा स्वराशीत प्रवेश; तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? ‘हे’ उपाय करुन पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 10:10 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिना महत्त्वाचा मानला गेला आहे. शुक्रचा कर्क प्रवेश, मंगळाचा वृषभ प्रवेश, सूर्याचा स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर आता नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रहाने सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीतून स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश केला आहे. याचा प्रभाव पुढील सुमारे २ महिने सर्व राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. (Budh Gochar in Kanya Rashi 2022)
2 / 15
सूर्याच्या राशीसंक्रमणानंतर बुध राशीपरिवर्तन करुन कन्या राशीत प्रवेश करेल. अगदी काही दिवसांसाठी सूर्य आणि बुध सिंह राशीत एकत्रितपणे विराजमान असतील. सूर्य आणि बुधाच्या युतीने शुभ असा बुधादित्य योग तयार होणार आहे. (Mercury Transit Virgo 2022)
3 / 15
बुध ग्रह आकर्षक व्यक्तिमत्वाचे प्रतिक मानला जातो. या काळात बुध काही राशींना लाभदायक ठरेल आणि काही लोकांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार आहेत. बुध गोचराचा प्रभाव कोणत्या राशीवर कसा राहील आणि त्याचे उपाय काय आहेत, याबाबत जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल. मात्र, तुम्हाला काही चिंता सतावू असू शकतात. वैवाहिक जीवनावर प्रतिकूल प्रभाव दिसून येऊ शकतो. परंतु, तुम्हाला तुमच्या आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल. शक्य असेल तर गरजू मुलांना व विद्यार्थ्यांना पुस्तके दान करावीत.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. लेखन आणि पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना या काळात चांगले परिणाम मिळतील. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल. आर्थिकदृष्ट्याही हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. शक्य असेल तर दररोज तुळशीची पूजा करून दिवा लावावा.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश सुखकारक ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक जीवन देखील चांगले राहील.तुम्हाला तुमच्या आईचे पूर्ण सहकार्य आणि सहकार्य मिळेल. शक्य असेल तर गोमातेला अन्नदान करावे.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकेल. पत्रकारिता, लेखन, अभिनय आणि कन्सल्टिंग क्षेत्रांतील लोकांसाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. घाईघाईने कोणताही निर्णय न घेणे तुमच्यासाठी हितावह आहे. तसेच वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुमची भावंडंही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. शक्य असेल तर तुळशीला दररोज पाणी घाला.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश चांगला ठरू शकेल. तुम्ही थोडे आक्रमक होऊ शकता. वित्त क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असेल. तुमच्या कामात काही नवीन कल्पना वापरून तुम्ही पुढे जाल. विवाहितांनाही सासरच्या मंडळींकडून पूर्ण सहकार्य मिळेल. शक्य झाल्यास 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा जप दररोज १०८ वेळा करा.
9 / 15
बुधचा स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश झाला आहे. हे संक्रमण व्यावसायिकांच्या जीवनात फायदेशीर ठरेल. या काळात तुमचा व्यवसायही चांगल्या स्थितीत असेल. तुम्हाला निरोगी वाटेल पण तुमच्या फिटनेससाठी थोडा वेळ काढला पाहिजे, असे सांगितले जात आहे.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला व्यवहाराच्या बाबतीत जास्त सावध राहावे लागेल, त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या विश्वासू लोकांना तुमच्यासोबत ठेवा. घाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी या काळात विरोधकांपासून सावध राहावे. शक्य असल्यास बुधवारी मूग डाळ दान करा, असे सांगितले जात आहे.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकेल. वैयक्तिक जीवनातही तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांचे आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे सहकार्य मिळेल. समाजात तुमची कीर्ती वाढेल. तुम्ही करत असलेल्या कष्टाचे फळही तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे. शक्य झाल्यास बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा रोज जप करा.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश लाभदायक ठरू शकेल. राजकारण आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांसाठी काळ चांगला जाणार आहे. हे संक्रमण तुमच्या करिअरमध्येही सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. तुमचे तुमच्या पालकांसोबतचे संबंधही चांगले राहतील. शक्य असल्यास लहान मुलांना हिरव्या रंगाच्या भेटवस्तू द्याव्यात.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकेल. हा कालावधी चांगल्या संधी आणू शकतो. तुम्हाला या वेळेचा सदुपयोग करावा. तुम्हाला यश मिळू शकेल. वैयक्तिक जीवनातही तुम्हाला तुमचे वडील आणि गुरूंचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही लांबचा प्रवास करू शकता. या काळात तुमचे भावंड तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. शक्य असेल तर हिरव्या रंगाचा समावेश असलेली वस्त्रे भेट स्वरुपात द्यावीत.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश काहीसा आव्हानात्मक ठरू शकेल. आरोग्याच्या समस्या बळावू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. आर्थिकदृष्ट्याही हा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो. तुम्ही जमा केलेला पैसा हुशारीने खर्च करणे तुमच्यासाठी चांगले राहील. शक्य असेल तर गणपती बाप्पाचे पूजन करून दुर्वा अर्पण कराव्यात.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश चांगला ठरू शकेल. अविवाहित लोकांसाठी बुधाचे गोचर चांगले सिद्ध होऊ शकते. विवाह योग्य तरुणींसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. विवाहित लोकांचे आयुष्यही चांगले जाणार आहे. तुम्ही एखाद्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी वेळ मजबूत ठरू शकेल. शक्य झाल्यास हिरव्या रंगाचा समावेश असलेली मिठाईचा मंदिरात जाऊन अर्पण करावी.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य