शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्याच्या राशीत बुध वक्री: ७ राशींना मनोकामना पूर्तीचा काळ, धनसंचय शक्य; अडकलेला पैसा मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 2:03 PM

1 / 10
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात नवग्रहांपैकी महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करत आहेत. तर काही ग्रह नक्षत्र गोचर करत आहेत. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध १९ जुलै २०२४ रोजी सिंह राशीत विराजमान झाला आहे. सिंह ही सूर्याचे स्वामित्व असलेली रास आहे. नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याचे आणि बुधाचे समत्वाचे संबंध असल्याचे सांगितले जाते.
2 / 10
ऑगस्ट महिन्यात बुध सिंह राशीत वक्री होत आहे. यानंतर २२ ऑगस्टच्या सुमारास वक्री चलनाने बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ऑगस्टमध्ये वक्री झालेल्या बुधाचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर मोठा प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. एखाद्या ग्रहाचे वक्री होणे फारसे अनुकूल मानले जात नाही.
3 / 10
बुध आधी सिंह राशीत आणि कालांतराने कर्क राशीत वर्की चलनाने गोचर करणार आहे. सिंह राशीत वक्री होत असलेला बुध कोणत्या राशींसाठी उत्तम लाभदायक संधी, यश-प्रगती, सकारात्मकता, अनुकूलता आणू शकेल? जाणून घेऊया...
4 / 10
मिथुन: विविध क्षेत्रात यश मिळू शकते. दीर्घकाळापासून करत असलेल्या प्रयत्न अनुकूल ठरू शकतात. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात फायदा होऊ शकेल. रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. अर्थार्जनाचे नवीन मार्ग समोर येतील. धनसंचय करण्यात यश मिळेल.
5 / 10
सिंह: पैसा मिळवण्यात यश मिळू शकेल. नोकरदारांना इतर कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांनी नफा मिळविण्यासाठी केलेल्या योजनाही यशस्वी होण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदारासोबत कुठेतरी जाऊ शकता आणि एकत्र काही जमीन खरेदी करू शकता.
6 / 10
कन्या: तुम्ही घेतलेले निर्णय मोठे फायदे देऊ शकतात. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. आनंदी वातावरण राहील. काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. व्यापारी वर्गाला व्यवसायात यश मिळू शकेल. नवीन करार पूर्ण केल्याने आर्थिक लाभ होईल. मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवू शकाल. मुलाची प्रगती पाहून आनंद होईल.
7 / 10
तूळ: अपार यशासह आनंद मिळू शकतो. ध्येय साध्य करण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रोत्साहनासह पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही चांगली राहील. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या कालावधीत करू शकता. व्यवसायाच्या क्षेत्रात फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
8 / 10
धनु: कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नफा कमवू शकता. बचत करण्यात यशस्वी व्हाल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. गरजेनुसार व्यवसायात गुंतवणूक केली तर लाभ मिळू शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.
9 / 10
कुंभ: तणावातून दिलासा मिळू शकतो. जोडीदारासोबतचे काही मतभेद संपुष्टात येऊ शकेल. पैसे कुठेतरी अडकला असेल तर या काळात मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांची चांगली प्रगती होऊ शकेल. यवसायाचा विस्तार होऊ शकेल. सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकेल. प्रभावशाली लोकांशी ओळख होईल.
10 / 10
मीन: नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. नोकरदारांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. बुद्धिमत्ता आणि ज्ञानात चांगली वाढ होऊ शकेल. निर्णय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील. नोकरदारांना दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनाही चांगली बातमी मिळेल. कामात चांगले यश मिळेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य