५ राजयोगात अंगारकी विनायक चतुर्थी: ८ राशींना बाप्पा देईल बंपर लाभ, बक्कळ फायदा; भाग्योदय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:27 IST
1 / 12३० मार्च २०२५ पासून हिंदू नववर्षाला सुरुवात झाली. गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर, ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी आहे. विशेष म्हणजे नववर्षातील पहिल्याच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे अतिशय शुभ, पुण्याचे मानले गेले असून, यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.2 / 12०१ एप्रिल २०२५ रोजी चैत्र शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी अंगारक योग आहे. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन केले जाते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार या काळात विविध योग जुळून आले आहे. मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. 3 / 12आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत. मीन राशीतील ग्रहांच्या स्थितीमुळे विविध प्रकारचे ५ राजयोग जुळून आलेले आहेत. याशिवाय ०१ एप्रिल रोजी शुक्र ग्रह पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या पुढील चरणात प्रवेश करत आहे. अंगारकी विनायक चतुर्थीला हे सर्व योग जुळून आल्याचा काही राशींना चांगलाच लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. नेमका कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...4 / 12मेष: हा काळ खूप शुभ ठरू शकेल. बोलण्यातून प्रभाव आणि शक्ती दिसून येईल. कामे इतरांकडून करून घेऊ शकाल. परदेशात काम करणाऱ्या लोकांना अनपेक्षित फायदे मिळतील. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. भेट एखाद्या प्रिय आणि प्रभावशाली व्यक्तीशी होईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद राहील. 5 / 12वृषभ: खूप फायदे मिळू शकतात. अपार यश मिळू शकते. समाजात आदर वाढू शकतो. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. जे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकते. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. नवीन स्रोतांतून पैसे कमावण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. इच्छापूर्ती होऊ शकेल. बचतीच्या योजना यशस्वी होऊ शकतील. गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो.6 / 12मिथुन: लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. धार्मिक बाबींमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतील. नोकरीमध्ये बऱ्याच काळापासून ज्या समस्या येत आहेत, त्या संपुष्टात येऊ शकतात. पदोन्नतीसह पगारवाढ मिळू शकते. व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. व्यवसायात बनवलेली योजना रणनीती प्रभावी ठरू शकते. यासोबतच शिक्षण क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. आर्थिक स्थितीही खूप चांगली राहण्याची शक्यता आहे.7 / 12सिंह: भाग्याची साथ मिळू शकेल. नियोजित केलेले काम वेळेवर पूर्ण होऊ शकेल. बढती किंवा बदलीची इच्छा पूर्ण होऊ शकते. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. काही गैरसमज दूर होऊ शकतील. प्रियकरासोबत आनंदी क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळतील.8 / 12तूळ: शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय वाढेल आणि आर्थिक स्थितीही सुधारेल. व्यावसायिकांसाठी, हा काळ समृद्धीचा आणि व्यवसाय वाढीचा ठरू शकतो. इच्छा पूर्ण होऊ शकतील. आनंददायी घडना घडू शकतील. ओळखींचे वर्तुळ विस्तारेल. काही चांगली मिळण्याची शक्यता आहे. भावंडांकडून फायदा आणि पाठिंबा मिळेल. भौतिक सुखसोयी मिळाल्याने आनंद होईल. कौटुंबिक आणि कार्यालयीन काम सहज आणि वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकाल.9 / 12मकर: नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नातेसंबंधांमधील भावनिक बंध अधिक मजबूत होईल. एका खास नात्याकडे वाटचाल करत असाल, तर चांगले संबंध निर्माण करू शकाल. मानसिक शांतता लाभू शकेल. नियोजित योजना यशस्वी होतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. नवीन नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे.10 / 12कुंभ: आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल. कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्या अगदी सहजपणे सोडवू शकाल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. व्यवसाय वाढवू शकता. नातेसंबंधांमधील भावनिक संबंध अधिक मजबूत होऊ शकतील. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. नोकरीत चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. 11 / 12मीन: दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामाच्या पूर्ततेसह, संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. मेहनतीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवू शकता. आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकता. करिअरच्या क्षेत्रात काळ चांगला ठरू शकतो. बॉस योजना, कल्पनेवर खूष असू शकतो. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता.12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.