पंचग्रही योगात नववर्षाची पहिली कामदा एकादशी: १० राशींवर लक्ष्मी कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:58 IST
1 / 13चैत्र महिना सुरू आहे आणि हिंदू नववर्षातील पहिली एकादशी मंगळवार, ०८ एप्रिल २०२५ रोजी आहे. चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी कामदा एकादशी नावाने ओळखली जाते. महाभारत काळात पांडवांनीही या एकादशीचे व्रत केल्याची मान्यता आहे. श्रीकृष्णांनी पांडवांना या एकादशीचे व्रत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते, असे सांगितले जाते.2 / 13चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भगवान विष्णुकृपा प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छापूर्ती देखील होते. ज्योतिषशास्त्रानुसार, या एकादशीला अत्यंत शुभ योग जुळून आलेले आहेत.3 / 13मीन राशीत पाच ग्रहांचा शुभ योग जुळून आला आहे. आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, बुध, शुक्र आणि राहु हे ग्रह विराजमान आहेत. कन्या राशीत असलेल्या केतुशी या पंचग्रहांचा समसप्तम योग जुळून आला आहे. तर कर्क राशीतील मंगळाचा नवमपंचम योग जुळून आला आहे. मीन राशीत बुध मार्गी होणार असून, कर्क राशीत चंद्र आणि मंगळाचा युती योग जुळून आलेला आहे. या सर्व ग्रहस्थितीचा १० राशींना अत्यंत अनुकूल लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 13वृषभ: जीवनात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. पालकांकडून, शिक्षकांकडून आणि मार्गदर्शकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील बऱ्याच काळापासून चालत आलेले वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. समाजातील मान-सन्मान वाढू शकेल.5 / 13मिथुन: अचानक धनलाभ होऊ शकतो. देवी लक्ष्मीची कृपा होऊ शकते. नवीन संधी मिळू शकतात. उत्पन्नात वाढ दिसून येऊ शकेल. प्रेम जीवन चांगले राहू शकेल. करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय, आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगल्या ऑर्डर मिळू शकतात. ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. बचतीच्या योजना यशस्वी होऊ शकतात.6 / 13कर्क: भाग्याची साथ मिळू शकते. चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसायिक असाल तर करारांचा फायदा होऊ शकेल. विवाहित लोकांचे संबंध सुधारतील. कामाच्या किंवा व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता. या काळात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.7 / 13सिंह: यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. कष्टाचे फळ मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकेल. शेअर बाजार किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळू शकेल.8 / 13तूळ: परदेशांशी संबंधित बाबींमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी फायदे मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल. पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. आर्थिक बाबतीतही यश मिळू शकते. बौद्धिक क्षमता वाढू शकेल.9 / 13वृश्चिक: यश मिळू शकते. बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. नशीब बाजूने असेल तर नोकरी तसेच व्यवसायात मोठे फायदे मिळू शकतात. कल अध्यात्माकडेही असू शकतो. करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकेल.10 / 13धनु: जीवनात सकारात्मक बदल होताना दिसू शकतील. मनात एक वेगळाच उत्साह असेल. नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकाल. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. कारकिर्दीत यश मिळवू शकाल. काही समस्यांतून दिलासा मिळू शकतो. परंतु, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नये. अन्यथा नुकसान होऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे.11 / 13मकर: व्यवसायात नफा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. कोणताही प्रकल्प जो बराच काळ प्रलंबित होता तो पूर्ण होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद संपुष्टात येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होऊ शकते. काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. बॉस आणि सहकार्यांचे सहकार्य लाभू शकेल. वेळोवेळी आर्थिक लाभ होऊ शकतो.12 / 13कुंभ: पैशांची चणचण दूर होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसायिक असाल तर नवीन करारांचा फायदा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि पदोन्नती मिळू शकते.13 / 13मीन: अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकते. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. जीवनात सर्जनशीलता वाढेल. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.