शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्राची सांगता: ‘या’ ७ राशींना धनलाभ योग, अपार यश-प्रगती; प्रभू श्रीराम शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 7:07 AM

1 / 15
मार्च महिन्याची सांगता होत आहे. अवघ्या काही दिवसांनी मार्च महिना संपून आता एप्रिल महिन्याला सुरुवात होईल. मात्र, मार्च महिन्यातील विशेष योग अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहेत. मार्च महिन्याच्या सांगतेकडे जाताना श्रीराम नवमी आणि चैत्री नवरात्राची सांगता होत आहे. (Chaitra Navratri 2023)
2 / 15
देशभरात चैत्री नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहे. या नवरात्राची सांगता आता होणार आहे. चैत्री नवरात्राची सांगता श्रीराम नवमीच्या दिवशी होत आहे. प्रभू श्रीराम हे देशाचे आराध्य असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण देशभरात रामजन्माचा सोहळ्या उत्साहात साजरा केला जातो. चैत्री नवरात्राला श्रीराम नवरात्र असेही म्हटले जाते. (Shri Ram Navami 2023)
3 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु स्वराशीत म्हणजेच मीन राशीत अस्तंगत होत आहे. तर बुध मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. मीन राशीतील बुध आणि गुरुची युती समाप्त होऊन मेष राशीत राहु आणि बुधची युती होईल. याशिवाय श्रीराम नवमीच्या दिवशी अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? कोणत्या राशींना धनलाभाची संधी मिळू शकते? करिअर, नोकरीत कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतील? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यावसायिक प्रवासांवर लक्ष केंद्रीत करावे. प्रवास यशस्वी होईल. कामाच्या ठिकाणी सर्व काही चांगले असू शकेल. आर्थिक बाबतीत लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण होताना दिसत नाहीत. जीवनात काही तणाव राहील.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. कामे पूर्णपणे नियंत्रणात ठेवण्यास सक्षम असाल. आर्थिक बाबतीत फायदे होतील पण ते तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असतील. जीवनात आनंद आणि सुसंवाद घडू शकेल. चांगली बातमी मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. आर्थिक बाबतीत अनुकूल काळ राहू शकेल. धनाच्या आगमनासाठी शुभ संयोग घडतील. जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल. चांगले परिणाम समोर येतील आणि यश मिळेल. कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम आवश्यक आहेत, तरच प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी काळ यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. भागीदारीतील कामे विशेष यश मिळवून देतील. आर्थिक बाबतीत अनुकूल काळ राहू शकेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीचे संकेत प्राप्त होतील. चांगल्या बातम्या मिळू शकतात.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. ज्येष्ठ व्यक्तीची मदत मोलाची ठरू शकेल.आर्थिक प्रगतीचे शुभ संयोग घडतील. पैशाची वाढही हळूहळू होत राहील. निष्काळजीपणा न केल्यास चांगले परिणाम समोर येतील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आनंददायी ठरू शकेल. आर्थिक बाबतीत प्रगती होऊ शकेल. अचानक सकारात्मक बदल दिसून येतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जीवनात आनंद आणि सुसंवाद घडू शकेल. मान-सन्मान वाढेल. यश मिळेल. कोणत्याही कागपत्रांवर योग्य खात्री केल्याशिवाय स्वाक्षरी करू नये.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक दृष्टीकोनातून आगामी काळ अनुकूल राहू शकेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत एखाद्या महिलेची मदत मोलाची ठरू शकेल. अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये, अन्यथा त्रास वाढू शकतो. कालांतराने शुभ परिणाम दिसून येऊ शकतील.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. थोडा संयम आणि व्यवहारी निर्णय घेतल्यास चांगले होईल. प्रवासादरम्यान एखाद्या महिलेची मदत मोलाची ठरू शकेल. प्रश्न संवादाने सोडवले तर बरे होईल. नोकरीच्या ठिकाणी कोणतीही अपेक्षित बातमी मिळाल्याने मन उदास होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आनंददायी ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी वेळ तुमच्यासाठी अनुकूल काळ राहील. खर्च जास्त असू शकतो आणि खर्चाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कालांतराने शेवटी गोष्टी चांगल्या होतील. प्रवासाचे योग जुळून येऊ शकतील.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. एखाद्या निर्णयाचा फायदा होऊ शकेल. आर्थिक बाबतीत तुम्ही केलेले प्रयत्न फळाला येऊ शकतात. अचानक धनलाभाचे संकेत मिळू शकतात. आनंददायी वेळ घालवता येऊ शकेल. प्रवास यशकारक ठरू शकतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ प्रगतीचा ठरू शकेल. धनवृद्धीचे काही योग जुळून येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात. अडकलेले पैसे येऊ शकतात. मात्र, अपेक्षेपेक्षा मिळकत कमीच असू शकेल. चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी थोडेसे बंधन असू शकते आणि धैर्याने काही ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक बाबींमध्ये खर्चाची परिस्थिती निर्माण होत असून, गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मन चिंतेत राहू शकते. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. यशाची खात्री असेल तर बिझनेस ट्रिप करणे हिताचे ठरू शकेल. सामान्य यश मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यMONEYपैसाNavratriनवरात्रीRam Navamiराम नवमी