शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chanakya Niti : व्यक्तीला अग्नीशिवाय आयुष्यभर जाळत राहतात या ६ गोष्टी, वेळेत सावध व्हा!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: August 26, 2024 3:33 PM

1 / 9
आचार्य आर्य चाणक्य यांनी आपल्या नीतीच्या माध्यमाने संपूर्ण मानवजातीला यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार, लोकांनी काय करावे अथवा काय करू नये, या संदर्भात मार्गदर्शन केले आहे. जे आजही अनेक बाबतीत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरते.
2 / 9
आचार्य चाणक्‍य यांनी जीवनात येणाऱ्या समस्यांवर, दुःखावर कशा पद्धतीने मात करायला हवी? या संदर्भातही भाष्य केले आहे. चाणक्य नीतीच्या एका श्लोकात त्यांनी अशा ६ गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात दुःख येते आणि सुख-शांती निघून जाते. यामुळे ती व्यक्ती आयुष्यभर आतल्या आत जळत राहते. तर जाणून घेऊया काय आहेत त्या सहा गोष्टी...?
3 / 9
श्लोक - कुग्रामवासः कुलहीनसेवा कुभोजनं क्रोधमुखी च भार्या। पुत्रश्च मूर्खो विधवाच कन्या विनाग्निना षट् प्रदहन्ति कायम्।।
4 / 9
श्लोक - कुग्रामवासः कुलहीनसेवा कुभोजनं क्रोधमुखी च भार्या। पुत्रश्च मूर्खो विधवाच कन्या विनाग्निना षट् प्रदहन्ति कायम्।।
5 / 9
2. शीलहीन व्यक्तीची सेवा - चाणक्य आपल्या श्लोकात सांगतात, जर एखादी व्यक्ती चारित्र्यवान नसेल, शीलवान नसेल, चुकीच्या कामात गुंतलेली असेल तर, अशा व्यक्तीची सेवा अथवा नोकरी करू नये. अशा व्यक्तीची सोबतही एखाद्या चांगल्या व्यक्तीला बर्बाद करू शकते. यामुळे नेहमीच शीलवान व्यक्तीसोबतच रहावे.
6 / 9
3. खराब भोजन अथवा अन्न - कोणत्याही सजीव प्राण्यासाठी भोजन ही एक अनिवार्य गोष्ट आहे. मात्र, ते जेवढे अनिवार्य आहे, तेवढेच आपण कशा प्रकारचे भोजन घेतो, हेही महत्त्वाचे आहे. आपण घेत असलेले अन्न निकृष्ट अथवा खराब असेल, पौष्टिक नसेल, तर आपले आरोग्य बिघडेल. यामुळे अशा प्रकारचे भोजन घेणे वेदनादायी अथवा दुःखदायक आहे.
7 / 9
4. भांडखोर पत्नी - मनुष्याच्या जीवनात पत्नीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असेही बोलले जाते. मात्र तिचे आचरण योग्य नसेल, ती भांडखोर असेल आणि लहानसहान गोष्टींवरून सातत्याने वाद घालणारी असेल, तर अशी व्यक्ती जीवनात आनंदी अथवा सुखी राहू शकत नाही.
8 / 9
5. मूर्ख पुत्र - जर एखाद्या व्यक्तीचा पुत्र अथवा मुलगा मूर्ख निपजला असले, वाईट कामांत सहभागी असेल, तर आई-वडिलांना आयुष्यभर त्याच्यापासून त्रास सहन करावा लागतो.
9 / 9
6. विधवा मुलगी - आचार्य चाणक्य यांनी आपल्या श्लोकात म्हटले आहे की, मनुष्याला अति वेदना देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, त्याची विधवा कन्या अथवा मुलगी. त्यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीची मुलगी विधवा झाली तर पित्याला अत्यंत दुःख होते.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी