शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहु-चंद्राचा ग्रहण योग: ५ राशींना यश, परदेशी जाण्याची संधी; ३ राशींनी राहावे अखंड सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:09 AM

1 / 11
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह गोचरामुळे शुभ-प्रतिकूल योग जुळून येत असतात. त्याचा प्रभाव केवळ राशींवर नाही तर देश-दुनियेवर पडत असतो, असे सांगितले जाते. २५ जुलैपासून मीन राशीत ग्रहण योग जुळून येत आहे. तसेच याशिवाय मंगळ आणि गुरुचा शुभ योग आहे. शोभन योग, शुक्रादित्य योग असे काही योग जुळून येत आहेत.
2 / 11
राहु हा छायाग्रह मानला जातो. क्रूर मानला गेलेला राहु आताच्या घडीला मीन राशीत विराजमान आहे. तर २५ जुलैपासून पुढील दोन दिवस चंद्र मीन राशीत असेल. यामुळे मीन राशीत राहु आणि चंद्र यांचा ग्रहण योग जुळून येत आहे.
3 / 11
ग्रहण योग फारसा अनुकूल मानला जात नाही. परंतु, अन्य काही शुभ योगांचा सकारात्मक परिणाम काही राशींवर होऊ शकतो. कोणत्या राशींना आगामी कालावधी चांगला जाऊ शकतो. तर काही राशींसाठी हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 11
मेष: प्रवासादरम्यान आरोग्य आणि सामानाची काळजी घ्या. कोणतेही मोठी डील फायनल करू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. एखाद्या गोष्टीचा ताण येऊ शकतो. निद्रानाशाची तक्रार असू शकते. भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक करणे हिताचे ठरू शकेल, असे म्हटले जात आहे.
5 / 11
मिथुन: सरकारी योजनांचा लाभही घेता येईल. मित्रांसोबत फिरण्याची संधी मिळेल. नोकरदारांना ऑफिसमध्ये अधिकारी किंवा बॉसकडून आदर मिळू शकतो. प्रभाव वाढेल. भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर यशाची आणि चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. प्रियजनांकडूनही पूर्ण सहकार्य मिळू शकेल.
6 / 11
कर्क: विष्णू कृपेने मनोकामना पूर्ण होऊ शकतील. परदेशात जायची संधी मिळू शकते. व्यवसायात नफा मिळवू शकाल. नोकरदार कामाने इतरांना प्रभावित करू शकतील. अनेक सुवर्ण संधी मिळाल्याने आनंद होईल. जोडीदाराकडून आणि सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एकटेपणा जाणवणार नाही.
7 / 11
सिंह: मानसिक तणाव असू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन जपून चालवा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नका. नवीन काम सुरू करणे टाळावे. भगवान शंकराला लवंग अर्पण करा. ओम नमः शिवाय चा यथाशक्ती जप करावा.
8 / 11
कन्या: मन प्रसन्न राहील. महत्वाची माहिती मिळेल. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर इच्छापूर्ती होऊ शकेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकाल. नोकरदारांना करिअर प्रगतीसाठी सुवर्ण संधी मिळू शकतील. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत.
9 / 11
वृश्चिक: भविष्याची चिंता कमी होऊ शकेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. अचानक अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरदारांना आणि व्यावसायिकांना पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होऊ शकेल.
10 / 11
धनु: कुटुंबात वाद होऊ शकतो. मोठी गुंतवणूक टाळावी. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी बेफिकीर राहू नये. उधारी देणे टाळा. शक्य असेल तर शिवलिंगावर पंचामृत आणि बेलपत्र अर्पण करावे. पैशाची बचत करण्याची संधी मिळेल. कामे पूर्ण होऊ शकतील. अचानक काही चांगली बातमी कळू शकते.
11 / 11
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य