शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनीची वक्रीदृष्टी! मंगळ, शुक्र व गुरुबळ; चंद्रयान-३ च्या यशाचे भारताचे स्वप्न पूर्ण होईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 3:19 PM

1 / 9
काही दिवसांपूर्वी चंद्रयान-३ अवकाशात यशस्वीपणे झेपावले. चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण संपूर्ण देशाने साजरे केले. मात्र, हे चंद्रयान-३ चंद्रावर अचूकपणे उतरवण्याचे मोठे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात चंद्रयान-३ चंद्रापर्यंत पोहोचेल.
2 / 9
चंद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात आल्यानंतर आता भारताचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी होणार का याकडे केवळ देशाचे नाही, तर जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रयान-३ ज्यावेळेस अवकाशात झेपावले, त्यावेळेची मुहूर्त कुंडली नेमके काय सांगते? ग्रहबळ मिळून भारताचा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण होईल का? जाणून घेऊया...
3 / 9
भारताच्या या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेच्या मुहूर्त कुंडलीमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्राच्या निर्णय पद्धतीनुसार, वृश्चिक राशीचा उदय होत आहे. ही एक स्थिर रास असून, जलतत्त्वाची रास आहे.साधारणपणे, जेव्हा आपल्याला यंत्र किंवा वाहन चालवण्यासाठी एखादा मुहूर्त निवडावा लागतो, तेव्हा स्थिर लग्नाची कुंडली ग्राह्य धरली जात नाही.
4 / 9
चंद्र मोहिमेत लग्नस्थानी असलेल्या वृश्चिक राशीवर चंद्र, मंगळ आणि शनीदृष्टी पडत आहे. चंद्र शुभ रोहिणी नक्षत्रात आणि मिथुन राशीत त्याचा मित्र बुधाच्या नवांशमध्ये आहे. मुहूर्त कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानाचा स्वामी शनीची वक्रीदृष्टी पडत आहे. बुध मृत्यूच्या अंशात असल्यामुळे या कार्यक्रमात काही अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5 / 9
मुहूर्त कुंडलीमध्ये दशम स्थानी असलेला लग्नेश मंगळ, शुक्र आणि गुलिक वर पडणारी शनी व गुरुची दृष्टी समाधानकारक यश आणि देशातील शास्त्रज्ञांबद्दल आदर वाढवण्यारे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवार, रोहिणी नक्षत्र आणि वृद्धी योग हा एक उत्तम ज्योतिष योग मानला गेला आहे.
6 / 9
चंद्र-बुध-गुरूची विशोंत्तरी दशा मुहूर्त कुंडलीत आहे जी काही तांत्रिक त्रुटींसह समाधानकारक यश दर्शवते. चंद्रयान-३ च्या मुहूर्त कुंडलीमध्ये गुरु सहाव्या स्थानी असून, त्यावर शनीची प्रतिकूल दृष्टी आहे. मिशनच्या अखेरच्या टप्प्यांत काही अडचणी येण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात येत आहे.
7 / 9
चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होईल पण चंद्रावर उतरण्याच्या वेळी काही तांत्रिक समस्या निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुहूर्त कुंडलीनुसार, राशी व नवांश लग्न स्थानावर शनीची दृष्टी आणि बुध मृत्यूच्या भागात असणे ही चंद्र मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील संपर्क यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरू शकेल.
8 / 9
असे असले तरी चंद्रयान-३ भारतासाठी भविष्याचे नवीन दरवाजे उघडेल. संपूर्ण जग भारताच्या यशाचे आणि प्रयत्नांचे कौतुक करेल, असे सांगितले जात आहे. संपूर्ण देशवासीयांकडून चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्याची इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.
9 / 9
सदर दावे, कयास, शक्यता आणि ज्योतिषीय मान्यतांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3Astrologyफलज्योतिष