शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देवशयनी आषाढी एकादशी: ‘या’ राशींना चातुर्मास लकी, अपार लाभ-पैसा; यशाचा काळ हरिहर शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 5:20 PM

1 / 11
Chaturmaas 2024: यंदा १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीबरोबर चातुर्मास काळ सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होता. मराठी वर्षात चातुर्मासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देवशयनी एकादशीला श्रीविष्णू निद्रावस्थेत जातात, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यामुळे या चातुर्मासाच्या काळात महादेव सृष्टीचे चालन-पालन करतात, अशी लोकमान्यता प्रचलित आहे.
2 / 11
यंदा १७ जुलै रोजी चातुर्मास सुरु होणार असून १२ नोव्हेंबर रोजी त्याची समाप्ती होणार आहे. आषाढ महिन्यानंतर श्रावण सुरू होतो. श्रावणात भगवान शंकराची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. चातुर्मासाच्या काळात अनेक शुभ योग, ग्रह गोचर घडणार असून, याचा काही राशींना लाभ होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
3 / 11
चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची अपार कृपा काही राशींवर होऊ शकते, असे म्हटले जात आहे. एकूणच चातुर्मासातील ग्रहस्थितीचा काही राशींना उत्तम उपयोग होऊ शकतो. सकारात्मकता येऊ शकेल. आर्थिक आघाडी, शिक्षण, करिअर यांमध्ये यश आणि प्रगतीच्या सर्वोत्तम संधी प्राप्त होऊ शकतील, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 11
मेष: चातुर्मास अत्यंत शुभ ठरू शकेल. आर्थिक प्रगतीसोबतच करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. जीवनात सुख-समृद्धी येईल. पैसा वाचवण्यात यश मिळेल. नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतील. रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस निर्माण होऊ शकेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
5 / 11
वृषभ: चातुर्मासाचा काळ खूप शुभ ठरू शकेल. चातुर्मासात भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद असणार आहे. देवशयनी एकादशीनंतर अनेक अडचणी, समस्या दूर होऊ शकतील. नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे.
6 / 11
मिथुन: भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांची विशेष कृपा असू शकेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येऊ शकेल. जीवन जगण्याचा नवा मार्ग खुला होऊ शकेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होऊ शकतील. करिअरच्या क्षेत्रात फायदे होतील. सहकाऱ्यांचे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
7 / 11
कर्क: मानसिक तणावातून आराम मिळेल. करिअर व्यवसायात वाढ होऊ शकेल. प्रवासाची शक्यता आहे. हे प्रवास खूप फायदेशीर ठरू शकतील. नोकरीत बढती आणि पगार वाढण्याचीही शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहू शकेल.
8 / 11
सिंह: चातुर्मास खूप लाभदायक ठरू शकेल. भगवान विष्णूच्या कृपेने काही मोठे यश मिळू शकते. उत्पन्नात वाढ शक्य आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ शुभ राहणार आहे.
9 / 11
कन्या: येणारे चार महिने अविस्मरणीय ठरू शकतील. संकटांतून दिलासा मिळू शकेल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरीची स्थिती चांगली राहील. भगवान विष्णू आणि शिव यांच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश आणि धनप्राप्ती होऊ शकते. भरपूर नफा कमवू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अनेक संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडू शकतात. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. प्रदीर्घ काळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.
10 / 11
कुंभ: भगवान विष्णू, भगवान महादेव तसेच शनिदेवाची विशेष कृपा असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर आता चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीतील समस्या दूर होऊ शकतात. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मानसिक तणावातून आराम मिळेल. कौटुंबिक समस्या सुटू शकतात. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील.
11 / 11
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकAshadhi Ekadashiआषाढी एकादशी