शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२५च्या शुभारंभाला धन योग: ७ राशींना सुरुवात दमदार, वर्ष शानदार; व्हाल मालामाल, चांगले घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 07:07 IST

1 / 11
इंग्रजी नववर्ष २०२५ सुरु होत आहे. २०२५ हे वर्ष अनेकार्थाने विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण मानले गेले आहे. या एका वर्षात नवग्रहांपैकी सर्वांत महत्त्वाचे आणि अधिक परिणाम, प्रभाव असणारे ४ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. गुरु ग्रह अतिचारी गतीने संपूर्ण वर्षांत गोचर करणार असून, वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल.
2 / 11
तसेच नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वतःचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला की, मकर राशीची साडेसाती संपुष्टात येणार असून, मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. तर राहु आणि केतु हे छाया ग्रह मीन आणि कन्या राशीतून वक्री चलनाने अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.
3 / 11
असे असतानाच नववर्ष २०२५ च्या सुरुवातीला धन योग जुळून आला आहे. तसेच चंद्र आणि मंगळ ग्रह समसप्तक स्थानी आहे. तर बुध ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या गुरु राशीत प्रवेश करणार आहे. तसेच ०१ जानेवारी २०२५ रोजी धन योग, हर्षण योग आणि उत्तराषाढा नक्षत्राचा योग जुळून येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जुळून येत असलेल्या शुभ योगांचा कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकेल? जाणून घ्या...
4 / 11
वृषभ: प्रत्येक काम नियोजनपूर्वक करू शकाल. यश मिळेल. व्यवसायात नफा होईल. मालमत्ता खरेदीच्या संधीही मिळू शकतात. घरातील वातावरण आनंददायी होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
5 / 11
मिथुन: लाभदायक कालावधी ठरू शकेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होऊ शकेल. विरोधकांना उत्तर देण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांना कामाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. कुटुंब, मुलांकडून आनंद मिळेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये यश मिळू शकते.
6 / 11
सिंह: आगामी काळ शुभ फलदायी ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांना चांगली भेटवस्तू देऊ शकतात. कुटुंबात आनंद, शांततेच वातावरण असेल. नशिबाने साथ दिली तर पैसे मिळू शकतील. बँक बॅलन्स वाढू शकेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर शुभ धन योगाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल.
7 / 11
कन्या: प्रगतीचा आणि लाभाचा काळ आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. उत्पन्न वाढू शकेल. कामात चांगली कामगिरी करू शकाल. प्रवास फायदेशीर ठरतील. समाजात मान-सन्मान वाढेल. अचानक धनलाभही होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतील.
8 / 11
तूळ: उत्साही वाटेल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊ शकाल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात येणाऱ्या समस्या सुटू शकतात. मालमत्ता खरेदी करायची इच्छा पूर्ण होऊ शकेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळू शकते. सन्मानही वाढेल.
9 / 11
वृश्चिक: मेहनतीने यश मिळू शकेल. ऑफिस, कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. नोकरीत प्रगती आणि यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकेल. घरात मंगल कार्याच्या आयोजनाबाबत चर्चा होऊ शकते. भेटवस्तू मिळू शकतात.
10 / 11
धनु: भाग्याची उत्तम साथ मिळेल. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकेल. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सहकार्य राहील. प्रलंबित पैसे परत केले जाऊ शकतील. अनेक बाबतीत दिलासा मिळू शकेल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. मित्रांचे, भावंडांचे सहकार्य लाभेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची संधी मिळू शकते.
11 / 11
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यNew Year 2025नववर्षाचे स्वागतspiritualअध्यात्मिक