शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2021: दिवाळीत जुळून येतोय दुर्मिळ चतुर्ग्रही योग; ‘या’ ५ राशींवर होईल लक्ष्मी देवी मेहेरबान, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 1:04 PM

1 / 9
शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय म्हणजेच साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी ०१ नोव्हेंबर ते ०६ नोव्हेंबर दरम्यान दिवाळी साजरी केली जात आहे. (Diwali 2021)
2 / 9
यंदाच्या दिवाळीला दुर्मिळ आणि अद्भूत योग जुळून येत आहेत. चतुर्ग्रही योग तसेच प्रीती आयुषमान योगामुळे ही दिवाळी विशेष ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या दीपोत्सवात मंगळ, सूर्य, बुध आणि चंद्र यांचा चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. (chaturgrahi yoga in diwali 2021)
3 / 9
ग्रहांचा राजा सूर्य, राजकुमार बुध, सेनापती मंगळ आणि मनाचा कारक असलेला चंद्र यांमुळे या दिवाळीला लक्ष्मी देवीची विशेष कृपा काही राशीच्या व्यक्तींवर होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. यामुळे सुख, समृद्धी, आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या भाग्यवान राशीच्या व्यक्तींवर लक्ष्मी देवी मेहेरबान होऊ शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
मिथुन राशीच्या पंचम भावात हा चतुर्ग्रही योग जुळून येत असून, या राशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी फायदेशीर ठरू शकेल. सूर्य आणि बुधच्या युतीमुळे करिअर आणि कार्यक्षेत्रात यश तसेच प्रगती साध्य करू शकाल. तसेच विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनाही दिवाळी उत्तम लाभदायक ठरू शकेल. बौद्धिक विकास होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
5 / 9
कर्क राशीच्या चतुर्थ भावात हा अद्भूत चतुर्ग्रही योग जुळून येत असून, या राशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी आर्थिक लाभ मिळवून देणारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकेल. तर स्थावर मालमत्तेतून नफा मिळू शकेल.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींनाही ही दिवाळी मान, सन्मानाची प्राप्ती करून देणारी ठरू शकेल. तसेच या चतुर्ग्रही योगामुळे कौटुंबिक संपत्तीत वाढ होऊ शकेल. करिअरशी निगडीत एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. तसेच या कालावधीत घेतलेले निर्णय योग्य तसेच लाभदायक ठरू शकतील, असे सांगितले जात आहे.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना व्यवसाय, उद्योग, व्यापार यातून या दिवाळीत उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच या कालावधीत केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकेल. दिवाळीत एखादी महागडी भेटवस्तू आपल्याला प्राप्त होऊ शकते. तसेच भावंडांच्या माध्यमातूनही काही ना काही लाभ मिळू शकेल.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना जुळून येत असलेला चतुर्ग्रही योग लाभदायक ठरू शकतो. करिअरमध्ये येत असलेल्या अडचणी, समस्या दिवाळीच्या कालावधीत दूर होऊ शकतील किंवा त्यातून बाहेर पडण्याचा एखादा चांगला मार्ग आपल्याला सापडू शकेल. नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी उत्तम कालावधी असून, नोकरदारवर्गाला चांगला बोनस मिळू शकतो. वडिलांकडून काही लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.
9 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना जुळून येत असलेला चतुर्ग्रही योग लाभदायक ठरू शकतो. करिअरमध्ये येत असलेल्या अडचणी, समस्या दिवाळीच्या कालावधीत दूर होऊ शकतील किंवा त्यातून बाहेर पडण्याचा एखादा चांगला मार्ग आपल्याला सापडू शकेल. नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी उत्तम कालावधी असून, नोकरदारवर्गाला चांगला बोनस मिळू शकतो. वडिलांकडून काही लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य