शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2021: दीपोत्सव: धनत्रयोदशीला ‘या’ वस्तू घेणे अत्यंत शुभ; काय आहे चांदी खरेदीची परंपरा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 12:56 PM

1 / 10
विजयादशमी उत्साहात साजरी झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते दिवाळीचे. लगेचच दिवाळीच्या कामाची लगबग सुरू होतो. यंदाच्या वर्षी कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरल्याचे पाहायला मिळत असून, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजार अगदी फुलून गेल्याचे दिसले.
2 / 10
शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय म्हणजेच साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. (what to buy on dhanteras)
3 / 10
दिवाळीच्या दिवसांमध्ये महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. श्रीविष्णूंचे अंशवतार मानले गेलेले धन्वंतरी समुद्र मंथनातून प्रकट झाले, तो दिवस अश्विन कृष्ण त्रयोदशी धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाते. धनत्रयोदशी ही शुभ तिथी आणि उत्तम मुहूर्त म्हणून ओळखली जाते.
4 / 10
देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून धन्वंतरी सोन्याच्या कलशात अमृत घेऊन प्रकटले होते. यानंतर देवतांच्या धन, धान्य, समृद्धी, आनंद, वैभव १३ पटीने वाढले. म्हणूनच धनत्रयोदशीला विविध प्रकारच्या धातूच्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा प्रचलित झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
5 / 10
सन २०२१ मध्ये मंगळवार, ०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून ३१ मिनिटांनी त्रयोदशी सुरू होईल आणि बुधवार, ०३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजून ०२ मिनिटांनी समाप्त होईल. धनत्रयोदशीला सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपासून ते रात्री ०८ वाजून १० मिनिटांपर्यंत प्रदोष काळ असून, हा कालावधी धनतेरस पूजेसाठी उत्तम असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 10
धन्वंतरी हातात कलश घेऊन प्रकटले होते, म्हणून या दिवशी भांडी खरेदी करण्यावर भर असतो. विविध धातूंची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. घरात सुख, स्वास्थ्य आणि समृद्धी वृद्धिंगत होऊन आपण कमावलेला पैसा १३ पटीने वाढावा, अशी भावना आणि समज यामागे असल्याचे म्हटले जाते.
7 / 10
आताच्या घडीला धनत्रयोदशीला वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याकडे अधिक भर असतो. मात्र, धनत्रयोदशीच्या धनसंपदा आणि समृद्धीचा संबंध मूलतः धातूशी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला खरेदीच्या शुभ मुहूर्तावर धातू खरेदी करणे अत्यंत शुभ लाभदायक मानले गेले आहे.
8 / 10
धनत्रयोदशीच्या शुभ मुहुर्तावर चांदीची खरेदी करणे अत्यंत शुभ फलदायी मानले गेले आहे. चांदीतील गुंतवणूक लाभदायक ठरेल तसेच सोने खरेदी करणेही फायदेशीर ठरेल, असे सांगितले जात आहे. प्राचीन काळी चांदीची नाणी खरेदी करून त्याचा संचय केला जात आहे.
9 / 10
विवाहानंतर मुलीच्या पाठवणीवेळी याच चांदीच्या नाण्यांचा प्रामुख्याने वापर केला जात असे. कठीण प्रसंगी चांदीच्या नाण्यांचा व्यवहार करून त्यातून धनप्राप्ती करता येणे शक्य होत असे. म्हणूनच अगदी प्राचीन काळापासून सुरू झालेली चांदी खरेदीची परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळते.
10 / 10
धनत्रयोदशीला धने खरेदी करावे. लक्ष्मी देवी आणि गणपतीची मूर्ती किंवा तसबीर घरी आणावी. धनत्रयोदशीला कवड्या घ्याव्यात. धनत्रयोदशीला श्रीयंत्र खरेदी करावे. धनत्रयोदशीला गोमती चक्र घ्यावे, या ५ गोष्टींची खरेदी अत्यंत शुभ, लाभदायक असल्याचे सांगितले जाते.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2021