शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत राशीनुसार खरेदी करा; भाग्याची साथ अन् भरघोस लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 12:37 PM

1 / 13
दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हटले जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये दिवाळीला अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी नवीन कपड्यांपासून, वाहन, मालमत्ता, घर ते सोने-चांदीपर्यंत अनेकविध गोष्टी दिवाळीला खरेदी केल्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, आपण आपल्या राशीनुसार एखादी वस्तू खरेदी केल्यास त्याचा सकारात्मक लाभ आपल्याला मिळू शकतो, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
2 / 13
मेष राशीच्या व्यक्तींनी यंदाच्या दिवाळीला चांदीच्या वस्तू किंवा भांडी खरेदी करावीत. चांदीची खरेदी आपल्यासाठी शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तसेच एखादी प्रॉपर्टी खरेदी करणेही लाभदायक ठरू शकते.
3 / 13
वृषभ राशीच्या व्यक्तींनी दीपावलीनिमित्त सोने, चांदी किंवा हिरे संबंधित वस्तू खरेदी कराव्यात किंवा याचा एखादा दागिना खरेदी करावा. सोने, चांदी किंवा हिरा खरेदी विशेष लाभदायक करू शकेल, असे सांगितले जात आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून, सुख, संपन्नता आणि वैभवाचा कारक आहे.
4 / 13
मिथुन राशीच्या व्यक्तींनी दिवाळीनिमित्त सोन्याचा दागिना खरेदी करावा किंवा घरासाठी हिरव्या रंगाची वस्तू खरेदी करावी. जर आपण चांदीचा गणपती घरी आणला, तर तो धनसंपदा वृद्धिंगत करणारा ठरू शकतो, असे सांगितले जाते.
5 / 13
कर्क राशीच्या व्यक्तींनी यंदाच्या दिवाळीला श्रीयंत्र घरी आणावे. यामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभू शकेल. तसेच चांदीचा कलश किंवा चांदीची शिव-पार्वतीची मूर्ती घरी आणली, तर ते अत्यंत मंगलकारी ठरू शकेल, असे म्हटले जात आहे.
6 / 13
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दीपोत्सवानिमित्त सोने खरेदी उत्तम मानली जात आहे. दिवाळीला सोन्याची नाणी, दागिना खरेदी करणे अत्यंत शुभ ठरू शकेल. सोने खरेदी शक्य नसेल, तर तांब्याशी निगडीत वस्तूंची खरेदी करावी. यामुळे आपल्याला लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
7 / 13
कन्या राशीच्या व्यक्तींनी दिवाळीला हस्तीदंताची एखादी वस्तू खरेदी करावी. असे केल्याने धनवृद्धी होऊ शकेल. तसेच दुर्गा देवीसाठी चांदीचे छत्र बनवून अर्पण करू शकता. यामुळे घरात धन-धान्याची कमतरता भासणार नाही, असे म्हटले जात आहे.
8 / 13
तूळ राशीच्या व्यक्तींनी दिवाळीला सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित वस्तूंची खरेदी करावी. आपण कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी गुलाबी रंगाचे कपडे खरेदी करू शकता. याशिवाय लक्ष्मी देवीच्या श्रृंगाराशी निगडीत वस्तू खरेदी करू शकता. असे केल्याने सुख, समृद्धी वाढू शकेल, असे सांगितले जात आहे.
9 / 13
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. सोने खरेदी शक्य नसेल, तर तांब्याची वस्तू खरेदी करणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
10 / 13
धनु राशीच्या व्यक्तींसाठी यंदाच्या दिवाळीला वाहन खरेदी उत्तम मानली जात आहे. याशिवाय चांदीची खरेदी अत्यंत शुभ असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कुटुंबात संपन्नता येऊ शकते.
11 / 13
मकर राशीच्या व्यक्तींसाठी वाहन, चांदीची नाणी, चांदीचे दागिने तसेच स्टीलच्या वस्तूंची खरेदी अत्यंत शुभ मानली गेली आहे. याशिवाय गृहसजावटीच्या वस्तू खरेदी करणेही उत्तम मानले गेले आहे.
12 / 13
कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला चांदीच्या वस्तू खरेदी कराव्यात. याशिवाय स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करणे आपल्यासाठी अत्यंत फलदायी मानले गेले आहे.
13 / 13
मीन राशीच्या व्यक्तींसाठी चांदी अत्यंत शुभ मानली गेली आहे. त्यामुळे चांदीची नाणी, चांदीच्या वस्तू, चांदीचे दागिने खरेदी करणे लाभदायक मानले गेले आहे. तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे खरेदी करू शकता, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य