शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुभ महालक्ष्मी वर्ष: ‘या’ ९ राशींना शानदार; लक्ष्मी कृपेने वर्ष जाईल दमदार; यश, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 1:53 PM

1 / 15
यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासात पार पडत आहे. यंदाचे दिवाळीचे वर्ष हे महालक्ष्मी वर्ष असून, ते अतिशय शुभ असल्याचे सांगितले जात आहे. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. (Diwali 2022)
2 / 15
अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपोत्सव. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते. महालक्ष्मी वर्षाच्या कुंडलीवरून पुढील वर्षीची दिवाळी आणि दिवाळी यातील स्थिती पाहिली जाते. या महालक्ष्मी वर्षात शनि, गुरूसह अनेक ग्रह बदलतील. त्यामुळे सर्व राशींच्या जीवनात चढ-उतार आणि शुभ प्रभाव दिसून येतील.
3 / 15
आगामी वर्षात नवग्रहांचा गुरु बृहस्पति, न्यायाधीश शनी हे दोन मोठे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर साडेसाती चक्रात बदल होणार आहे. एकूणच या महालक्ष्मी वर्षाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुभ-लाभ मिळू सकतो, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष आनंददायी ठरू शकेल. करिअरमध्ये लाभ मिळू शकेल. तसेच कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल. शनी मार्गी होऊन मकर राशीत आहे. तुमच्यातील धैर्य आणि आक्रमकता यात वाढ होऊ शकेल. शनी पुन्हा कुंभ राशीत जाईल, तेव्हा तुम्हाला जीवनात शांतता लाभेल, असे सांगतिले जात आहे.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष सकारात्मक ठरू शकेल. भौतिक सुविधा मिळतील. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागले. अन्यथा आर्थिक बचतीवर परिणाम होऊ शकेल. मात्र, योग्य नियोजन केल्यास आर्थिक आघाडी मजबूत होऊ शकेल. आगामी काळात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. करिअरच्या दृष्टिने चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष अनुकूल ठरू शकेल. जीवनात नवा दृष्टिकोन मिळू शकेल. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडतील. शनी ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केल्यावर ढिय्या प्रभावापासून मुक्तता मिळू शकेल. करिअरमध्ये शुभवार्ता मिळू शकतील. वादविवादापासून दूर राहणे उपयुक्त ठरू शकेल. पराक्रम आणि साहसाने यश, प्रगती प्राप्त करू शकाल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष अनुकूल ठरू शकेल. अनामिक भीती वाटू शकेल. कार्यक्षेत्रात अति काम झाल्याने शारीरिक तणाव जाणवू शकेल. वादापासून दूर राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे. संयम आणि समजुतीने गोष्टी हाताळणे हिताचे राहील. मित्रांची मदत मोलाची ठरू शकेल. आपल्या कामाचे, गुणांचे कौतुक केले जाऊ शकेल. विविध प्रकारचे लाभ मिळू शकतील.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष आनंददायी ठरू शकेल. विविध प्रकारच्या सुखांचा अनुभव घेता येऊ शकेल. आर्थिक आघाडी मजबूत राहू शकेल. करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नवीन विचार स्फुरतील. मात्र, योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नये. अन्यथा नुकसान होऊ शकते. शुभवार्ता मिळू शकतील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष अनुकूल असेल. काही घटनांमुळे मानसिक तणाव लाभू शकेल. मात्र, मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीही घडू शकतील. गुरुच्या शुभ प्रभावामुळे नशीब आणि भाग्याची साथ लाभू शकेल. वाहन सुखाचा आनंद घेऊ शकाल. व्यावसायिकांना यश मिळून चांगला फायदा होऊ शकेल. प्रतिकूल परिस्थितीतही हाती घेतलेली कामे मार्गी लागून प्रगती साध्य करता येऊ शकेल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष सकारात्मक ठरू शकेल. कौटुंबिक जीवन उत्तम राहू शकेल. दाम्पत्य जीवनात काहीशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आगामी काळात कीर्ती वाढेल. भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकाल. आपले कौतुक, प्रशंसा होईल. जुनी गुंतवणूक फायद्याची ठरू शकेल. करिअरमध्ये यश प्राप्त होऊ शकेल. व्यावसायिक आपला व्यवसाय विस्तारू शकतील.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष अनुकूल ठरू शकेल. जीवनाच्या अनेक टप्प्यांवर तुम्ही आनंदी होऊ शकाल. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतील. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवावे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे करिअरमध्ये चांगले यश प्राप्त होऊ शकेल. मात्र, आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे. जोखीम पत्करून व्यवहार करू नयेत. वादात मध्यस्थी करू नका.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष उत्तम ठरू शकेल. राशीस्वामी गुरुच्या शुभ प्रभावामुळे करिअरमध्ये नवनवीन संधी प्राप्त होऊ शकतील. शनीच्या कुंभ प्रवेशानंतर साडेसातीपासून पूर्णपणे मुक्ती मिळेल. जुनी चिंता संपेल. प्रतिष्ठा वाढेल. एखाद्याच्या अनुभवातून फायदा होण्याचे संकेतही आहेत. करिअरमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक आघाडी मध्यम राहील. कोणतेही अनावश्यक प्रलोभन टाळा.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष संमिश्र राहू शकेल. शनीच्या कुंभ प्रवेशानंतर साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू होईल. आर्थिक व्यवहार करताना अतिशय सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतील. व्यवसायिकांना व्यवसाय विस्तारातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष यशकारक ठरू शकेल. आत्मविश्वासामुळे तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. परदेशातून लाभ होईल. सरकारकडून तुम्हाला लाभ मिळू शकतो. मुलाकडून शांतता आणि अस्वस्थता दोन्ही मिळू शकेल. तुम्हाला आनंद मिळेल. व्यक्तिमत्वाचे आकर्षण वाढेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी वर्ष आनंददायी ठरू शकेल. राशीस्वामी गुरुच्या शुभ प्रभावामुळे सकारात्मकता मिळू शकेल. आशा वाढतील. तुमचे करिअर चांगले होईल. आर्थिक आघाडी चांगली होऊ शकेल. वर्षाचा उत्तरार्ध चांगला ठरू शकेल. वादविवादांपासून दूर राहावे. कोणालाही पैसे उधार देऊ नयेत, अन्यथा ते परत मिळू शकणार नाहीत. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग घेऊ शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने केलेली आर्थिक गुंतवणूक लाभ देईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य