शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2022: दीपोत्सव: दिवाळीत ‘या’ ८ राशींना सोने-चांदीची खरेदी ठरेल शुभ; लक्ष्मी कृपा अन् लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 1:38 PM

1 / 9
अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपोत्सव. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन हे दिवाळीचे मुख्य दिवस. हे दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानले जातात; कारण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी अनेक ठिकाणी लक्ष्मी देवीसह कुबेर, धन्वंतरी यांचे पूजन केले जाते. (Diwali 2022)
2 / 9
या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यामुळे संपत्तीत अनंत वृद्धी होते, असे मानले जाते. मात्र, यंदा सन २०२२ मध्ये ऐन दिवाळीत खंडग्रास सूर्यग्रहण आहे. याशिवाय शनी ग्रह मकर राशीत मार्गी होत आहे. अशा स्थितीत सोने-चांदी खरेदी करणे कितपत शुभ राहील आणि सूर्यग्रहणातील ग्रहांच्या स्थितीचा कोणत्या राशींनी सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ राहील, ते जाणून घेऊया...
3 / 9
यंदाच्या वर्षी २५ ऑक्टोबरला गोवर्धन पूजेच्या दिवशी सूर्यग्रहण होणार आहे. यावेळी सूर्य तूळ राशीत असेल. सूर्यासोबतच येथे शुक्र देखील असेल. अशा स्थितीत चांदीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत बरीच अस्थिरता असेल.
4 / 9
चांदीची किंमत ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान स्थिर राहील आणि पौष तसेच कार्तिक महिन्यात वाढू शकेल. १५ नोव्हेंबरपर्यंत सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत किमती चढ-उतार होतील. सोने-चांदीचा व्यापार करणाऱ्यांना डिसेंबर २०२२ पर्यंत फारसा त्रास होणार नाही, असे सांगितले जात आहे.
5 / 9
यंदाचे भारतात दिसणारे सूर्यग्रहण तूळ आणि स्वाती नक्षत्रात होणार आहे. सूर्य, चंद्र, बुध, शुक्र हे सर्व तूळ राशीत असतील. विशेष म्हणजे या कालावधीत शनी आपल्या उच्च तर, सूर्य नीच राशीत असेल. २३ ऑक्टोबरपासून शनी मकर राशीत मार्गी होत आहे. शनीची दृष्टी या राशींवर असेल. त्यामुळे या राशींवर मोठा परिणाम दिसून येऊ शकेल.
6 / 9
तूळ, कर्क, मेष, मकर राशीच्या लोकांसाठी इंट्राडे आधारावर सोन्याचा व्यापार शुभ परिणाम देणार नाही. १८ जानेवारी २०२३ रोजी नंतरच तुम्हाला सोन्याच्या खरेदी-विक्रीमध्ये नफा मिळत आहे.
7 / 9
वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ राशीच्या स्थिर राशींसाठी सूर्यग्रहण सकारात्मक परिणाम देईल. सूर्याशी संबंधित कोणतेही दान जसे गहू, सूर्य मंत्राचा जप केल्यास सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. या राशीच्या लोकांनी सोने-चांदीच्या खरेदीत हुशारीने पैसे गुंतवावेत. अंशतः लाभ होऊ असेल.
8 / 9
मिथुन, कन्या, धनु, मीन राशीच्या द्विस्वभावाच्या राशींसाठी सूर्यग्रहण सर्वांत सकारात्मक परिणाम आणेल. बँका, कर्जदारांशी कोणताही करार व्यवसायात फायदेशीर ठरेल. शांततापूर्ण तोडगा निघेल. या राशीचे लोक इच्छित असल्यास सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतात.
9 / 9
ज्यांना ऑक्टोबरमध्ये दिवाळीसाठी सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल त्यांनी शुभ मुहूर्तावर खरेदी करावी. धनत्रयोदशीच्या दिवशीसूर्यास्तापूर्वी सोने खरेदी करण्यासाठी हा चांगला काळ आहे. २२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान सोने खरेदी करत असाल, तर ते वापरण्यापूर्वी त्याची पूजा करावी, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिषGoldसोनंSilverचांदी