शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2022 Numerology: दीपोत्सव: ‘या’ ५ मूलांकांची दिवाळी; लक्ष्मी देवी-धनदेव कुबेराची कृपा, शुभ-लाभ, अपार सुख-पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:09 AM

1 / 12
अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपोत्सव. या दिवाळीपासून महालक्ष्मी वर्ष सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Diwali 2022 Numerology)
2 / 12
ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते.
3 / 12
तुमच्या जन्मतारखेच्या मूलांकानुसार, दिवाळीचा सण तुमच्यासाठी कसा असेल, तुम्हाला लाभाच्या अनेक संधी या कालावधीत मिळू शकतील का, तुमचे नोकरी, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन आणि आरोग्य कसे असेल, हे सर्व तुम्ही तुमच्या मूलांकावरून जाणून घेऊ शकता. तुमच्यासाठी ही दिवाळी तुमच्यासाठी कशी असेल, तुमचा मूलांक कोणता, जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. या मूलांकाच्या व्यक्तींसाठी दिवाळी सामान्य राहू शकेल. व्यावसायिकांना नफा मिळविण्यासाठी योग्य नियोजन करून पुढे जावे लागेल. आरोग्याबाबतही थोडे सावध राहा. कौटुंबिक जीवनात वेळ चांगला जाईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. नोकरदारांनी या काळात अधिकाऱ्यांशी वाद घालणे टाळावे.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. या मूलांकाच्या व्यक्तींसाठी दीपोत्सव कालावधी संमिश्र ठरू शकेल. घरातील सदस्यांकडून तुम्हाला लाभ मिळू शकतो. लोकांचे बोलणे तुम्हाला वेदनादायी ठरू शकते. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मन एकाग्र राहणार नाही, त्यामुळे या काळात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना दिवाळी लाभदायक ठरू शकते. व्यावसायिकांना भरपूर नफा मिळू शकतो. या काळात गुरु ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच मीन राशीत असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांपासून थोडे सावध राहावे लागेल. औषधे वेळेवर घ्यावीत.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. दिवाळीच्या कालावधीत राहु मेष राशीत विराजमान आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकेल. तुम्हाला यश मिळू शकते, दिवाळीनंतर अपूर्ण कामे पूर्ण करू शकता. तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रगतीचे मार्ग सुकर होऊ शकतात. मात्र, फटाके वाजवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना दिवाळीचा काळ उत्तम ठरू शकेल. बहिणींकडून काही चांगली बातमी मिळू शकते. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संचित धनातही वाढ होऊ शकते. नातेवाईकांकडूनही लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांनी चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे टाळावे, अन्यथा याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकेल. नुकसानास सामोरे जावे लागू शकेल, असे सांगितले जात आहे.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. दिवाळीच्या कालावधीत शुक्र आपलेच स्वामित्व असलेल्या तूळ राशीत विराजमान आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना दिवाळी सकारात्मक ठरू शकेल. घरातील लोकांच्या इच्छा पूर्ण करू शकाल. तुम्ही घरातील ज्येष्ठ सदस्य असाल तर, घरातील सदस्यांना खूश करण्यासाठी प्रयत्न करू शकता. वैवाहिक जीवनातही चांगले परिणाम मिळतील. आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केल्याने तुमचे बजेट खराब होऊ शकते. भौतिक गोष्टींवर भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि स्नेह राहील.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना दिवाळीचा कालावधी लाभदायक ठरू शकेल. जंगम मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुने वाहन विकून तुम्ही पैसे कमवू शकता. दिवाळीत फटाके वाजवताना सावधगिरी बाळगावी. कुटुंबात तुमच्या शब्दाला मान मिळेल. आगामी काळ आनंददायी असू शकेल. जोखीम घेणे टाळावे. विवाहितांनी आपल्या जोडीदाराशी काळजीपूर्वक बोलावे, अन्यथा वाद होऊ शकतो.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. दिवाळीत शनी आपलेच स्वामित्व असलेल्या स्वराशीत म्हणजेच मकर राशीत मार्गी होणार आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना दिवाळी सुखद ठरू शकेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून भरीव नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अज्ञात स्त्रोताकडून फायदा होऊ शकतो. आळस झटकून कामाला लागल्यास तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात काही मोठे यश मिळू शकते.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. दिवाळीचा कालावधी शुभ ठरू शकेल. तुम्हालाही काही नवीन शिकायला मिळू शकेल. तुम्ही योग्य निर्णय घेण्यास सक्षम असाल, तर्क करण्याची क्षमता वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातही यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. छंद जोपासण्यासाठी वेळ द्याल. भावंडांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2022numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष