शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीत अद्भूत योग: ५ राशींवर लक्ष्मी-कुबेर कृपा, भौतिक सुख; येणी मिळतील, अनेकपट लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 12:53 PM

1 / 9
दिवाळी सुरू झाली आहे. गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस ते भाऊबीज हे दिवाळीचे मुख्य दिवस. शुक्रवारी धनत्रयोदशी असून, रविवारी लक्ष्मीपूजन आहे. १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असून, १५ तारखेला भाऊबीज आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीच्या या दिवसांमध्ये ग्रहांचा अद्भूत योग जुळून येत आहे.
2 / 9
धनत्रयोदशीपासून ग्रहांचे अतिशय शुभ संयोग जुळून येत आहेत. धनत्रयोदशीला चंद्र कन्या राशीत असेल. या राशीत शुक्र विराजमान असून, शुक्र आणि चंद्राच्या संयोगामुळे कन्या राशीत कलानिधि योग तयार होईल. या शुभ काळात धनत्रयोदशीला केलेली खरेदी शुभ ठरू शकेल. धनत्रयोदशीला संपत्ती आणि आर्थिक लाभ देणारे हस्तनक्षत्र असेल.
3 / 9
कन्या राशीतून चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीत मंगळ आणि सूर्य ग्रह विराजमान आहेत. यामुळे तूळ राशीत मंगळ, सूर्य आणि चंद्र यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. तसेच मेष राशीतील गुरूची शुभ दृष्टी पडणार असून, गजकेसरी राजयोग जुळून येत आहे.
4 / 9
या शुभ संयोगात जमीन आणि अन्य मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात भरपूर नफा मिळू शकेल. दिवाळीत ३० वर्षांनंतर शनी मूळत्रिकोण राशीत कुंभ राशीत मार्गी झाला आहे. या सर्व शुभ योगांनी सजलेल्या या दीपोत्सवात संपत्तीकारक देवी गजलक्ष्मीच्या आशीर्वादाने ५ राशींना उत्तम लाभ मिळू शकतात. जाणून घेऊया...
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना दिवाळीत ग्रहांचे अद्भूत योग लाभकारक ठरू शकतील. जीवन सुख-समृद्धीने भरून जाईल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर राहील. मान-सन्मान वाढेल. भौतिक सुख मिळेल. जीवनात उपभोगाची साधने वाढतील. कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल. परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना दिवाळीत ग्रहांचे अद्भूत योग भाग्यकारक ठरू शकतील. कुटुंबात आनंद वाढेल. नोकरीच्या शुभ संधी मिळू लागतील. संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने अचानक कुठेतरी अडकलेला पैसा मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात अनेक पटींनी नफा मिळेल. व्यवसायात मोठी कमाई करू शकता.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना दिवाळीत ग्रहांचे अद्भूत योग मालामाल करू शकतील. व्यवसायात चमक येईल. नोकरीत शुभ संधी मिळतील. इतर एखाद्या संस्थेतून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. पण या संदर्भात कोणताही निर्णय नीट विचार करूनच घ्यावा. जी काही गुंतवणूक कराल, त्यात तुम्हाला नफा मिळू शकेल.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना दिवाळीत ग्रहांचे अद्भूत योग लाभदायक ठरू शकतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनात धन-समृद्धीची शुभ शक्यता निर्माण होत आहे. भरपूर नफा मिळेल. काही उत्तम संधी मिळू शकतात. आर्थिक बाजू मजबूत असेल. अचानक कुठेतरी अडकलेले पैसे मिळून अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना दिवाळीत ग्रहांचे अद्भूत योग उत्तम ठरू शकेल. शुभ योगाच्या प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात अनेक उत्कृष्ट संधी मिळू शकतात. वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होईल. आर्थिक लाभ होतील. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे. जीवनातील यशाचे प्रमाण वाढेल. माध्यमांशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यDiwaliदिवाळी 2023