Diwali 2024: Don't buy 'these' items this Diwali; Alakshmi will come home instead of Lakshmi!
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी! By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 2:48 PM1 / 5ज्योतिष शास्त्रानुसार नवीन वस्तूंच्या खरेदीमुळे घरात वृद्धी होते, तिलाच आपण लक्ष्मीकृपा म्हणतो. मात्र लक्ष्मी जशी वृद्धी करणारी असते तशी अलक्ष्मी ही घरातील संपत्तीचा नाश करणारी असते. दिवाळीत या दोन्ही रूपांची पूजा केली जाते. पण लक्ष्मीने घरात वास करावा आणि अलक्ष्मीने घरातून काढता पाय घ्यावा हा त्यामागचा हेतू असतो. ज्योतिष शास्त्रानुसार पुढे दिलेल्या वस्तूंची खरेदी अलक्ष्मीच्या आगमनाला कारणीभूत होते आणि नुकसान होते. त्यासाठी टाळा पुढील चुका!2 / 5यंदा २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सप्ताह असणार आहे. पण त्याची खरेदी येत्या आठवड्याच्या आतच पूर्ण होईल. म्हणून शॉपिंगला जाण्याआधी ज्योतिष शास्त्राने दिलेल्या सूचना लक्षात ठेवा आणि खरेदी करा!3 / 5दिवाळी हा रंगांचा सण असल्याने आपण रंगीबेरंगी कपड्यांची खरेदी करतो. मात्र काही जणांना काळा रंग अतिशय आवडतो. त्यांच्या कपड्यांच्या संग्रहात एखादा तरी काळा ड्रेस, साडी, शर्ट असतोच. काळा रंग सांस्कृतिक कार्यक्रमात, धार्मिक कार्यक्रमात निषिद्ध मानला गेला आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार काळ्या रंगाच्या कपड्यांची खरेदी जरूर करा, पण दिवाळी नंतर! दिवाळीत काळे कपडे घालणे टाळा. 4 / 5अनेकांना आठवडा बाजारातून किंवा ठराविक दुकानातून कमी किंमतीत तांब्या-पितळ्याची भांडी आणून वापरायला आवडतात. सध्या त्या भांड्यांचे ट्रेंड परत आल्यामुळे आपल्याकडेही तसे कलेक्शन असावे असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र स्वस्त दरात मिळणारी ही भांडी वापरलेली असू शकतात. वापरलेल्या भांड्याबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते, म्हणून निदान दिवाळीत तरी हा मोह टाळा. 5 / 5दिवाळी हा प्रेमाचा, ऋणानुबंध दृढ करणारा सण असल्यामुळे या कालावधीत धारदार वस्तूंची खरेदी टाळावी. यासाठी दसऱ्याला शस्त्रपुजन करून घेतले जाते. दिवाळीत लक्ष्मी पूजन करायचे असते. म्हणून कात्री, सूरी, मिक्सर यांची खरेदी दिवाळीच्या दिवसात शक्यतो टाळावी! आणखी वाचा Subscribe to Notifications