शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 11:46 AM

1 / 13
दिवाळी आधी मिळणाऱ्या बोनसची आपण सगळेच वाट बघत असतो. एव्हाना तो अकाउंटला जमा झाला असेलही! पण त्यात भर म्हणून नशिबाचा बोनसही आज मिळणार आहे. शश राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये प्रगतीच होईल. नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला व्यवसायात भरपूर पैसे मिळतील. मेष राशीपासून मीन राशीपर्यंत धनाच्या दृष्टीने आजचा शनिवार कसा फळणार ते पाहू!
2 / 13
दैव आज मेष राशीच्या लोकांच्या बाजूने आहे आणि तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुमचा दिवस यशस्वी होईल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात काही नवीन बदल होतील ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत व्यवसायात चांगला नफा मिळेल.
3 / 13
वृषभ राशीच्या लोकांना थोड्या अडथळ्यांचा सामना करावा लागेल. पण दुपारनंतर भाग्याची साथ लाभेल. बऱ्याच काळापासून अडलेले काम मार्गी लागण्याचे संकेत मिळतील. सहकारी साथ देतील. चांगल्या प्रोजेक्टसाठी तुमची निवड होईल आणि भविष्यात त्याचे आर्थिक लाभ देखील मिळतील. व्यावसायिकांना आजच्या शश योगाचा लाभ ऐन दिवाळीत अनपेक्षित रित्या मिळेल.
4 / 13
मिथुन राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने फायदा होईल आणि तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. जर तुम्हाला एखाद्या कामात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ते करू शकता, भविष्यात तुम्हाला फायदा होईल. कुटुंबात मतभेद होतील. संध्याकाळी वाहन बिघडल्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. कोणत्याही बाबतीत अतिघाई करू नका. दिवाळी आनंदात जाईल, आर्थिक वृद्धी होईल.
5 / 13
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल, पण तुमची प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने नवीन कामांचा शोध सुरू कराल. जर तुम्ही इतरांच्या उणिवा शोधणे बंद केले तर तुमचा दिवस शांततेत जाईल आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.
6 / 13
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस खूप भाग्याचा आहे. मौल्यवान वस्तू मिळाल्याने आनंद होईल. तुम्ही तुमच्या चैनीवर पैसे खर्च कराल आणि गरिबांना दानधर्मदेखील कराल. तुमच्या वक्तृत्वाने आणि कार्यक्षमतेने इतरांना प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला धर्म आणि अध्यात्मात रस वाढेल आणि दिवाळीत तुमचे मन प्रसन्न राहील.
7 / 13
कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस यशाने भरलेला असेल आणि तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळून आनंद मिळेल. तुमचा प्रभाव वाढेल, मात्र संध्याकाळपर्यंत काही अनावश्यक खर्च समोर येतील जे तुम्हाला नाईलाजाने पूर्ण करावे लागतील. तुमचा दिवस सुरळीत आणि यशस्वीरीत्या जाईल आणि दिवाळीत तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल.
8 / 13
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यग्र असेल. पण कामाचा, कष्टाचा आनंदही मिळेल. ऑफिस किंवा आप्तेष्टांकडून चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीत अधिकार वाढतील आणि जबाबदाऱ्याही वाढतील. सर्वजण तुमच्या धैर्याची आणि शौर्याची प्रशंसा करतील. तुमच्या योजना यशस्वी होतील आणि येत्या काळात तुम्ही अधिक कार्यक्षम व्हाल.
9 / 13
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. तुम्हाला काही कारणाने आरोग्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात. तुम्हाला अनावश्यक खर्चालाही सामोरे जावे लागेल, पण त्यामुळे तुम्ही प्रिय जनांची मर्जी संपादन करू शकाल. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल. रात्री एखाद्या शुभ कार्यक्रमाला हजेरी लावल्याने तुमचे मन प्रसन्न होईल आणि दिवाळीचा पुरेपूर आनंद घ्याल.
10 / 13
धनु राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये लाभ आणि यशाचा दिवस असून नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला काही काळ सामाजिक कार्यातही सहभागी व्हावे लागेल. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. प्रलंबित पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. जास्त ताण घेतल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. आपल्या खाण्याच्या सवयींवर विशेष नियंत्रण ठेवून आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहा. दिवाळीत लाभ संभवतो आणि प्रगतीच्या संधी येतील.
11 / 13
मकर राशीच्या लोकांना नशीब साथ देईल आणि व्यवसायात फायदा होईल. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल आणि संपत्तीत वाढ झाल्याने आनंदी व्हाल. तुमचा काही वाद प्रलंबित असेल तर त्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. संध्याकाळचा काळ देवाच्या भक्तीमध्ये जाईल. पुण्यकर्मात मग्न राहाल. दिवाळी सुख, सौख्य, समाधान घेऊन येईल.
12 / 13
कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल आणि आजचा दिवस तुमच्या भविष्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहे. आध्यात्मिक आणि चांगल्या कार्यात तुमची आवड वाढेल आणि तुमच्या कुटुंबाचे नाव उंचावेल. मोठ्यांच्या आशीर्वादाने कामात यश मिळेल. संध्याकाळी, तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसह आनंद मिळेल आणि दिवाळीत नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल.
13 / 13
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कामाने वेढलेला असेल. पण त्याचा मोबदला तुम्हाला आनंदात मिळेल. संध्याकाळी आनंददायी घटना घडतील किंवा शुभ वार्ता कळतील. भविष्यात होणाऱ्या आर्थिक लाभाच्या संधी आढळून येतील. व्यावसायिकांना सध्या काही बाबतीत तडजोड करावी लागली तरी दिवाळीत दुप्पट लाभ होईल. कुटुंबीयांबरोबर दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य