शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झोपताना आपल्या आसपास ठेवू नका या गोष्टी, पडतो अशुभ प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 1:44 PM

1 / 6
आजच्या युगात सुखी आणि समृद्ध जीवनासाठी चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहे. धार्मिक मान्यतांनुसार झोपताना डोक्याजवळ काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. या गोष्टी डोक्याजवळ ठेवल्याने झोपेवर तर परिणाम होतोच, शिवाय जीवनात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया या गोष्टींबद्दल...
2 / 6
पुस्तकांमुळे ज्ञान वाढते, पण डोक्याजवळ पुस्तके असणे शुभ मानले जात नाही. अनेकांना झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय असते आणि झोप आल्यावर पुस्तक डोक्याजवळ ठेवले जाते. ज्योतिषशास्त्रात असे करणे चांगले मानले जात नाही, यामुळे व्यक्तीला करिअरशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. पुस्तकांचा कारक ग्रह बुध आहे आणि पुस्तके अव्यवस्थित आणि डोक्याजवळ ठेवल्याने कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत होते, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर होतो.
3 / 6
मोबाईल, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे डोक्याजवळ ठेवू नयेत, असे केवळ ज्योतिषच नव्हे तर शास्त्रज्ञांचेही मत आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या रेडिएशनचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार किरणोत्सर्गाचा संबंध राहूशी असल्याचे मानले जाते. डोक्याजवळ मोबाईल ठेवल्याने राहूला बळ मिळते, त्यामुळे तुमचे काम बिघडू लागते. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप आदी वस्तू डोक्याजवळ ठेवू नयेत.
4 / 6
तसं तर घरात साफसफाई असणं महत्त्वाचं आहेच. परंतु झोपण्यापूर्वी आपल्या जवळची जागा स्वच्छ करून झोपा. असे मानले जाते की जर डोक्याभोवती स्वच्छता नसेल तर राहुचा प्रभाव जीवनात वाढतो आणि तो आपल्या मनाप्रमाणे कामे करू लागतो. त्याचा मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो.
5 / 6
सोने हे पवित्र आणि शुभ धातू मानले जाते. परंतु त्याचा थेट संबंध गुरूशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा धातू डोक्याभोवती किंवा उशीखाली ठेवू नये. असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्यामध्ये राग वाढू शकतो आणि कुंडलीतील गुरुचे स्थानही कमकुवत होऊ लागते. बहुतेक लोक झोपण्यापूर्वी डोक्याजवळ सोने ठेवतात, जे चुकीचे आहे.
6 / 6
अनेकांना झोपण्याच्या खोलीत शूज किंवा चप्पल आणण्याची सवय असते. तसंच झोपताना चप्पल किंवा खोलीत ठेवतात. काही लोक चप्पल पलंगाखाली ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. त्याचा तुमच्या मेंदू आणि मनावर वाईट परिणाम होतो. यासोबतच तुमच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो असे म्हटले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष