शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वप्नात स्वतःला किंवा दुसऱ्याला रडताना पाहून घाबरू नका; हे आहेत शुभ संकेत भविष्यातील शुभ घटनांचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:28 PM

1 / 5
सुख आणि दुःखं जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दुःखं आल्याशिवाय सुखाची किंमत कळणार नाही आणि सुखामागे दुःखं येणार या जाणिवेने सुखाची गुर्मी चढत नाही. त्यामुळे सुख आले म्हणून मातू नये आणि दुःखं आले म्हणून खचून जाऊ नये असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत. हाच धागा पकडून आपण आपल्या मनःस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. स्वप्न शास्त्र आपल्याला याबाबत दिलासा देताना वाईट स्वप्नांमागे दडलेले गुपित सांगत आहे.
2 / 5
स्वप्नामध्ये स्वतःला रडताना पाहणे हे स्वप्न शास्त्रानुसार शुभ संकेत आहेत. याचाच अर्थ लवकरच परिस्थिती बदलणार आहे. हे बदल साधारण नाही तर सकारात्मक असणार आहेत. म्हणून घाबरू नका. हे ही दिवस जातील, असे म्हणत स्वतःला धीर द्या, कारण कोणतीही परिस्थिती दीर्घकाळ टिकून राहत नाही. अगदी दुःखं देखील नाही.
3 / 5
त्यामुळे स्वप्नात स्वतःला हमसून हुमसून रडताना पाहिले टेन्शन घेऊ नका. जाग येताच स्वतःला दिलासा द्या, ते एक स्वप्नं होते. स्वप्नातून जाग आल्यावर जशी परिस्थिती वेगळी असते, तशीच परिस्थिती आगामी काळात बदलणार आहे याची खात्री बाळगा.
4 / 5
मात्र स्वप्नात लहान मुलाला रडताना पाहणे एखाद्या संकटाचे भाकीत ठरू शकते. कारण हसणं हा मुलांचा स्थायी भाव असतो. ती रडतात आणि क्षणार्धात हसू लागतात. त्यामुळे त्यांची हसरी छबी मनावर ठासलेली असते. याउलट स्वप्नात मुलांना रडताना पाहणे आगामी संकटाची चाहूल ठरू शकते.
5 / 5
तसेच कधी कधी स्वप्नात आपल्याला अनोळखी लोक दिसतात. अपरिचित परिसर दिसतो. भयावह चित्र दिसते. अशा स्वप्नांचाही फार विचार करू नका. स्वप्न शास्र सांगते, की अशा अपरिचित मार्गाने सुख तुमचा शोध घेत तुमच्या कडे येत आहे. त्याच्या स्वागताला सज्ज राहा!