Don't blame fate, follow the substitutes given by your zodiac sign and be successful!
नशिबाला दोष देत बसू नका, राशीनुसार दिलेले उपाय करा आणि यशस्वी व्हा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:55 PM1 / 12मेष राशीच्या लोकांनी कोणत्याही मंगळवारपासून पुढील २७ दिवस सातत्याने गणपतीला दुर्वा वहाव्यात. 2 / 12नोकरीत अडचणी उद्भवत असतील तर तुमच्या सोयीनुसार कोणत्याही सोमवारपासून महादेवाला पुढील २७ दिवस पांढरे फुल अर्पण करावे आणि सुगंधी अत्तर लावावे. 3 / 12या राशीच्या लोकांनी सलग एक महिना हनुमान चालीसा किंवा हनुमान स्तोत्र म्हणावे. 4 / 12या राशीच्या लोकांनी सलग चाळीस दिवस पिंपळाच्या वृक्षाखाली तेलाचा दिवा लावावा. 5 / 12श्रावण मासात या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करावा. 6 / 12सूर्यपूजा तुम्हाला लाभदायी ठरू शकते. तसेच सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे तुम्ही अनुभवू शकता. सलग महिनाभर सूर्यपूजा करा. 7 / 12या राशीच्या लोकांनी गरजूंना फळं किंवा जीवनावश्यक गोष्टींचे दान करावे, ते शक्य नसेल तर महिनाभर एखाद्या भिक्षेकऱ्याला केळं द्यावे. 8 / 12या राशीच्या लोकांनी सलग नऊ दिवस देवीच्या मंदिरात दूध, दही, तांदूळ, खोबरे यांसारख्या पांढऱ्या वास्तूचे दान करावे. 9 / 12या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा असल्याने त्यांनी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करावे. 10 / 12या राशीच्या लोकांनी सलग २७ दिवस गणपती बाप्पाला लाडू, गूळ खोबरे, खडीसाखर असा कोणताही यथाशक्ती नैवेद्य दाखवावा, तो प्रसाद सर्वांना वाटावा आणि स्वतः ग्रहण करावा, फरक जाणवेल. 11 / 12कुंभ राशीच्या लोकांनी महादेवाचा अभिषेक करावा. बेलाचे पान वाहावे आणि शिवस्तोत्र पठण करावे. 12 / 12मीन राशीच्या लोकांनी सलग महिनाभर पिंपळाच्या वृक्षाला ११ प्रदक्षिणा घालाव्यात. आणखी वाचा Subscribe to Notifications