Don't keep broken mirrors in the house, because feng shui architecture says ...
घरात फुटलेले आरसे, काचा ठेवू नका, कारण फेंगशुई वास्तुशास्त्र सांगते... By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 12:57 PM1 / 6फेंग शुई, चीनचे वास्तुशास्त्र, घरातून नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी फेंग शुईमध्ये घरगुती वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याचे मार्ग सांगितले गेले आहेत. या वस्तूंमध्ये आरसा खूप महत्वाचा आहे. जर आरसा चुकीच्या जागी ठेवला तर वास्तुदोष निर्माण होतात. तो भग्न अवस्थेत असेल तर नकारात्मक गोष्टी घडू लागतात. याउलट, जर आरसा घरात योग्य ठिकाणी असेल तर कुटुंबातील लोकांची प्रगती, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर खूप चांगला परिणाम होतो.2 / 6जर घराचा आरसा तुटलेला असेल तर तो लगेच काढून टाका. एकतर तो कधीही तुटून इजा होण्याची भीती असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेल्या आरशात भग्न प्रतिमा पाहणे खूप अशुभ ठरते.3 / 6फेंग शुईच्या मते, आरसा कधीही जमिनीलगत ठेवू नये, तर नेहमी जमिनीपासून काही इंच वर ठेवावा. व्यवसायाच्या ठिकाणी आरशाची अशाच पद्धतीने मांडणी करा. त्यामुळे तो फुटण्याची भीती तर राहत नाहीच, शिवाय व्यवसायात नफा होईल. 4 / 6आपल्याकडे एक म्हण आहे, हातच्या कंकणाला आरसा कशाला? पण वास्तू शास्त्र सांगते, आपल्या तिजोरीत आरसा ठेवा. अर्थात आपल्या दागदागिन्यांना, धन संपत्तीला आरसा दाखवा. त्यामुळे समृद्धीत वाढ होते. 5 / 6एकतर बेडरूममध्ये आरसा लावू नका आणि जरी आरसा असला तरी अशी जागा निवडा, जिथून झोपलेल्या व्यक्तीला त्याचे प्रतिबिंब दिसणार नाही. 6 / 6शिडीखाली आरसा कधीही ठेवू नका. विशेषतः बंगल्यामध्ये शिडीखाली ड्रेसिंग टेबल ठेवले असेल, तर तिथून ती जागा बदला. शिडीखाली आरसा असणे हे कलहास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये अकारण वाद विवाद होतात. त्यामुळे घराचे वातावरण बिघडायला वेळ लागत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications