शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रह्म मुहुर्तावरील स्वप्ने असतात अत्यंत शुभ; धनलाभ, सुख-समृद्धी योग, पैसे कमी पडत नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 3:07 PM

1 / 12
स्वप्न पडत नाहीत, असा माणूस जगात शोधून सापडणार नाही, असे म्हटले जाते. स्वप्न ही माणसाला मिळालेले एक प्रकारे वरदान आहेत, असे सांगितले जाते. कारण, स्वप्न माणसाला जगण्याची उमेद, प्रेरणा, उत्साह, आशावाद देत असतात. स्वप्नातील जग हे वेगळेच असते. (Dream Astrology)
2 / 12
काही स्वप्न माणसाच्या कायम स्वरुपी लक्षात राहतात. तर काही स्वप्न क्षणार्धात विरतात. एखाद्या व्यक्तीला स्वप्नात नेमके काय दिसेल, याचा काहीच नेम नाही. काही स्वप्न अत्यंत आनंददायी असतात, तर काही स्वप्न भीतीदायक असतात.
3 / 12
एखादा झोपले माणसाला कोणते स्वप्न पडेल, हे कुणाच्याही हातात नसते. काही स्वप्न संपूच नयेत, असेही वाटत असते. काही जणांना स्वप्नात दृष्टांतही मिळत असतो. मात्र, ब्रह्म मुहुर्तावर पडलेली स्वप्न खरी ठरतात, अशी मान्यता आपल्याकडे आहे.
4 / 12
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्ने आपल्याला भविष्याविषयी अनेक प्रकारची माहिती देतात. पहाटे ३ ते ५ या वेळेत पाहिलेली स्वप्ने अनेकदा सत्यात उतरतात. या कालावधीत पाहिलेली अनेक स्वप्ने तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देतात, कोणती स्वप्ने आहेत जी अमाप संपत्तीचे मालक बनण्याची संकेत देत असतात, ते जाणून घेऊया...
5 / 12
पहाटे ब्रह्म मुहुर्तावर जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला धान्याच्या ढिगाऱ्यावर चढताना पाहिले आणि त्याला तत्काळ जाग आली, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
6 / 12
स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात एखाद्या लहान बाळ उत्साहात, मजा-मस्ती करताना दिसले तर हे धनवान बनण्याचे लक्षण असल्याचे मानले जाते.
7 / 12
जर तुम्हाला स्वप्नात पाण्याने भरलेला कलश किंवा घागर दिसली, तर याचा अर्थ तुम्हाला धनलाभ होईल. त्याचबरोबर ब्रह्म मुहूर्तावर मातीचे भांडे किंवा घट दिसले तर तेही शुभ मानले जाते. अशी स्वप्ने पाहून माणसाला अपार संपत्ती मिळते, असे म्हटले जाते.
8 / 12
जर तुम्ही स्वप्नात ब्रह्म मुहुर्तावर नदीत डुबकी मारताना पाहिले तर ते एक अतिशय शुभ आणि फलदायी स्वप्न आहे. जेव्हा तुम्हाला अशी स्वप्ने पडतात, तेव्हा तुम्हाला उधार दिलेले पैसे लवकरच परत मिळतात, असे सांगितले जाते.
9 / 12
जर एखाद्याला स्वप्नात दात तुटताना दिसले तर स्वप्न शास्त्रानुसार अशी स्वप्ने नोकरी व्यवसायात लाभ मिळण्याचे संकेत देतात.
10 / 12
जर तुम्ही स्वप्नात नोकरीसाठी मुलाखत देताना दिसले तर तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे असे समजावे. याशिवाय स्वप्नात पितरांचे येणे देखील लाभाचे लक्षण आहे.
11 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेक शास्त्रांपैकी एक स्वप्न शास्त्र आहे. माणसाला पडणाऱ्या स्वप्नांवरून त्याचे तर्क, अंदाज बांधले जातात. काही जणांना वारंवार, अनेकदा एकाच प्रकारची स्वप्न पडतात, अशावेळी त्यामागील कारणे शोधण्यासाठी काही वेळा याचा आधार घेतला जातो, असे सांगितले जाते.
12 / 12
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांविषयी संबंधित तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष