शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Dreams About Ocean : स्वप्नात समुद्र किंवा पाऊस दिसला तर त्याचा अर्थ काय?, जाणून घ्या संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 8:09 PM

1 / 6
Dreams Related to Water : अनेकदा आपण स्वप्नात अशा गोष्टी पाहतो ज्याबद्दल ना आपण कधी एकलं असतं ना कधी आधी पाहिलेलं असतं. शास्त्रात कोणत्या स्वप्नाचा कोणता अर्थ आहे, याबद्दल माहिती दिली आहे. कोणतं स्वप्न शुभ कोणतं अशुभ याची माहितीही तुम्ही घेऊ शकता. आज पाहूया स्वप्नात पाणी दिसण्याचा अर्थ काय?
2 / 6
स्वप्नात जर कोणाला नदीचं पाणी दिसलं, तर ते शुभ संकेत मानले जातात. याचाच अर्थ लवकरच त्या व्यक्तीची अपूर्ण स्वप्नं पूर्ण होणार आहेत. याशिवाय तुम्हाला धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. अशा स्वप्नाचा संकेत म्हणजे तुमच्या सर्व समस्या दूर होण्याची शक्यता आहे.
3 / 6
जर स्वप्नात समुद्राचं पाणी दिसलं तर तो एक अशुभ संकेत मानला जातो. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या वाणीमुळे कोणत्यातरी वादात अडकू शकता. समुद्राचं पाणी खारं असतं, यासाठी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुम्हाला काही समस्या निर्माण होऊ शकतात.
4 / 6
जर तुम्हाला स्वप्नात पाऊस दिसला तर हा शुभ संकेत मानला जातो. याचाच अर्थ तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे किंवा तुम्हाला लवकरच काही शुभ वार्ता समजणार आहे असा होतो.
5 / 6
जर तुम्हाला स्वप्नात अशुद्ध पाणी दिसलं तर ते शुभ संकेत मानले जात नाही. याचाच अर्थ, येणाऱ्या काही काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला स्वप्नात स्वच्छ पाणी दिसलं तक तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो. तसंच अशा प्रकारचं स्वप्न व्यापार आणि नोकरीमध्ये यश मिळण्याचे संकेतही असतं.
6 / 6
स्वप्नात विहिरीतील पाणी दिसलं आणि ती विहिर पाण्यानं भरलेली असे तर हा शुभ संकेत असल्याचं म्हटलं जातं. याचाच अर्थ तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता असते. आता या सर्व शक्यता वाचून तुम्हाला कोणती स्वप्नं पडतात याचा विचार करा पण त्यात अडकून राहू नका. स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचे काम नक्की करतील. टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित आहे.